Pune RTO | पुणेकरांचा रिक्षा प्रवास महागणार, RTO कडून रिक्षाच्या दरवाढीस मंजुरी; जाणून घ्या किती रुपये वाढणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune RTO | पुण्यात आता रिक्षाचा प्रवास माहणार आहे. पहिल्या दीड किमीसाठी दोन रुपये तर त्यानंतरच्या प्रत्येक किलोमिटरसाठी पुणेकरांना 1 रुपया मोजावा लागणार आहे. गुरुवारी पुणे आरटीओने (Pune RTO) रिक्षाच्या दरवाढीस (Rickshaw fare hike) मंजुरी दिली आहे. नवे दर 8 नोव्हेंबर पासून लागू होणार आहे. हे दर पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) आणि बारामती (Baramati) या शहरांना लागू होणार आहेत.

मागील काही दिवसांपासून वाढत्या इंधनदरामुळे व खटुवा समितीच्या (Khatuwa Committee) शिफारसी लागू करण्याची रिक्षा संघटनांच्या (rickshaw association) मागणीमुळे आरटीओने या दरवाढीस मान्यता दिली आहे. दरवाढी संदर्भात आरटीओ कार्यालयात (Pune RTO) रिक्षा संघटनेसोबत बैठक पार पडली होती. यामध्ये भाडेवाढ करण्याचे निश्चित झाले होते. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात जवळपात 90 ते 95 हजार रिक्षा आहेत.

सहा वर्षानंतर दरवाढ
सध्या पहिल्या दीड किमीसाठी 18 रुपये दर आकारले जात आहेत.
आता त्यासाठी 20 रुपये द्यावे लागतील. त्यानंतरच्या प्रत्येक किमीसाठी सध्या 12 रुपये दर आहे तो 13 रुपये आकारण्यात आला आहे.
रिक्षा दरवाढ सहा वर्षानंतर झाली असल्याचे रिक्षा फेडरेशनचे बापू भावे (Bapu Bhave) म्हणाले.
तसेच ही दरवाढ गरजेची असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title :- Pune RTO | auto rickshaw travel will be expensive pune residents they will have pay extra rs 2 first one and half km

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Price Today | सोन्याच्या दरात तेजी, 47 हजारच्या जवळ पोहचले; चांदीची सुद्धा चमक वाढली, जाणून घ्या नवीन दर

Pune Anti Corruption | 2.5 लाखाची लाच घेताना पुण्यातील शिक्षण संस्थेच्या महिला अध्यक्षासह तिघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, शैक्षणीक क्षेत्रात प्रचंड खळबळ

LIC Aam Aadmi | ‘एलआयसी’चा सर्वात स्वस्त प्लान ! अवघ्या 200 रुपयांच्या वार्षिक प्रीमियमवर हजारोंचा फायदा; जाणून घ्या