Pune RTO Close New Rickshaw Permit | पुणे RTO चा मोठा निर्णय ! नवीन रिक्षा परवाने बंद होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune RTO Close New Rickshaw Permit | पुण्यात आता नव्याने रिक्षा परवाने (Rickshaw Permit) दिली जाणार नाहीत. शहराची वाढती लोकसंख्या सोबतच वाढते रिक्षा परवाने लक्षात घेता पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (Pune Regional Transport Office-RTO) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे आरटीओकडून राज्य शासनाला (Maharashtra State Government) देण्यात आलेल्या ठरावाला नुकतंच मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे रिक्षा परमिट बंद होणार आहे.

 

सध्याच्या स्थितीला पुणे शहरात (Pune City) रिक्षाच्या परमिटची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर रिक्षाचालकांमध्ये स्पर्धात्मक स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, 2017 ते 2022 या कालावधीमध्ये पुणे आरटीओ कार्यालयातून आतापर्यंत जवळपास 36 हजार 519 परवान्यांचे वाटप करण्यात आली आहे. परंतु, परवान्यांची वाढती संख्या लक्षात घेता आरटीओकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Web Title :- Pune Regional Transport Office Pune RTO Announced New Rickshaw Permit Close

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा