Pune RTO : लर्निंग लायसन्स विभागाचे कामकाज सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरु होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गर्दी वाढू नये म्हणून, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) येथील लर्निंग लायसन्स विभागाचे कामकाज सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरु होणार आहे. लायसन्सचा कोटा वाढल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कामाचे तास वाढवण्यात आले आहे.

लायसन्सचे वेटिंग कमी करण्यासाठी आरटीओ कार्यालयास परिवहन आयुक्तालयाने कोटा वाढवण्याची सूचना दिली होती. त्या अनुषंगाने अलीकडे कोट्यामध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर गर्दी वाढत असल्याने आरटीओ प्रशासनाकडून सकाळी साडेसात ते सायंकाळी सहा या वेळेत काम सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सुधारित ऑनलाइन अपॉईंटमेंट कोटा ऑनलाइन संगणक प्रणालीवर उलपब्ध करुन दिल्याचं, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी सांगितलं. दररोज प्रत्येक दीड तासांचे टप्पे करण्यात आले असून, प्रत्येक टप्प्यात १०० उमेदवार याप्रमाणे प्रतिदिन ७०० उमेदवांराच्या चाचण्या घेण्यात येणार आहे.

तथापि, वेळ वाढवण्यात आल्याने संबंधित उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. सकाळी साडेसात वाजता कार्यालय सुरु होणार असल्याने गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. कोरोनाचा प्रसार पाहता या निर्णयाचे लर्निंग लायन्सनसाठी इच्छुक असणाऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like