Pune : मुठा नदीपात्रात पुन्हा एकदा मगर दिसल्याची अफवा; भिडे पुलाजवळ तुफान गर्दी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुठा नदीपात्रात पुन्हा एकदा मगर दिसल्याची अफवा पसरली असून, भिडे पुलाजवळ मगर पाहण्यासाठी तुफान गर्दी झाली आहे. डेक्कन पोलिसांना याचे फोन गेल्याने पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

गेल्या आठवड्यात भिडे पुलाजवळ नदीपात्रात मगर दिसली असा, कॉल नियंत्रण कक्षाला मिळाला. त्यानंतर डेक्कन पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तसेच वनविभाग धावत पळत याठिकाणी आले. त्यांनी मगर पकडण्यासाठी नदीपात्रात जाळ्या लावल्या. दोन दिवस हा मगर शोधण्याचा प्रयत्न सुरू होता. पण मगर काही मिळाली नाही. आता पुन्हा आज मगर दिसल्याची माहिती डेक्कन पोलिसांना मिळाली. मग, नंतर पुन्हा भिडे पुलावर तुफान गर्दी झाली आहे. येणारे जाणारे नागरिक आणि वाहन चालक थांबून मगर दिसते का हे पाहात आहेत. पण मगर अजून तरी कोणाला दिसली नाही, हेही तितकेच खरे. दरम्यान मगर आहे, म्हणून दगड मारणाऱ्या काही मुलांना मात्र पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेले आहे. त्यांना बसवून मगर कुठे आहे हे विचारले जात आहे.