चाकूच्या धाकाने लुटमार करणार्‍यांना अटक, पुणे ग्रामीणच्या LCB ची कारवाई

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – वाघोली व लोणीकंद परिसरात चाकूचा धाक दाखवून नागरिकांची लुटमार करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून आवळण्यात आल्या असून यामध्ये दोघांना ताब्यात घेतले आहे.

लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल निळकंठ भारती यांना वाघोली परिसरात चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून मोबाईल व रोख रक्कम पळवली. यावर त्यांनी लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या घटनेनंतर पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड, सहाय्यक पोलिस हवालदार दत्तात्रय गिरमकर, पोलिस हवालदार उमाकांत कुंजीर, सचिन गायकवाड, विजय कांचन, जनार्दन शेळके, ज्ञानेश्वर क्षीरसागर, धीरज जाधव, बाळासाहेब खडके याचे एक पथक तयार केले व्या गुन्ह्याची उकल करण्याच्या सूचना दिल्या.

एका बातमीदाराकडून या गुन्ह्यातील आरोपी मांजरी बुद्रुक येथील शिवाजी चौकात येणार असल्याची माहिती दिली. त्यानुसार या पथकाने सापळा रचून बातमीदाराच्या इशाऱ्यावरुन तेथे आलेल्या इसमास ताब्यात घेतले  त्याची चौकशी केली असता 1) राजेश सिताराम देवकर (गोपाळपट्टी, मांजरी) व 2) विशाल भरत देवकर (शिवाजी चौक, मांजरी)  नावे असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास करण्यासाठी त्यांना लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

visit : Policenama.com