उरुळीकांचन येथे सराईत आरोपींकडून पिस्टल व तलवार जप्त ; LCB च्या पथकाची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – उरुळीकांचन दत्तवाडी रोड येथुन एलसीबी शाखेच्या पथकाकडून दोन सराईत गुन्हेगारांना एक पिस्टल, जिवंत काडतूस व तलवारीसह जेरबंद करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे तसेच रेकॉर्डवरील पाहिजे फरारी आरोपी यांना पकडण्यासाठी विशेष मोहिम राबविणेबाबत आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील सहा. पोलीस उपनिरीक्षक दिलीप जाधवर, महेश गायकवाड, निलेश कदम, विद्याधर निचित, दत्तात्रय तांबे, गुरू गायकवाड, सुभाष राऊत यांचे पथक नेमण्यात आलेले होते.
pune-police
हे पथक लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये उरुळीकांचन परिसरात रेकॉर्डवरील पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेत असताना उरुळीकांचन येथे हंटर उर्फ महादेव पांगारकर हा कमरेला पिस्टल लावून तसेच राहूल भिलारे हा त्याच्या सोबत तलवार घेऊन दोघे नंबर नसलेल्या पल्सर मोटरसायकलवर दत्तवाडी रोड रेल्वे पुलाजवळ येणार असल्याची माहिती त्यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली होती. या खबरीमुळे वरील पोलीस पथकाने दत्तवाडी रोड, रेल्वे पुलाजवळ सापळा लावला व ते दोघे चाहूल लागताच ते पळून जाण्याचा प्रयत्नात असताना त्यांना जेरबंद केले.

आरोपी महादेव उर्फ हंटर पोपट पांगारकर वय २४ वर्षे रा.सहजपूर, ता. दौंड जि. पुणे व राहूल सुरेश भिलारे वय २७ वर्षे रा.जावजीबुवाची वाडी, ता. दौंड जि. पुणे. सध्या दोघे रा. उरुळीकांचन, इंदिरानगर ता. हवेली जि. पुणे यांना ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस, एक स्टीलचा रंग असलेली लोखंडी तलवार, मोबाईल तसेच काळे रंगाची बजाज पल्सर-२२० मोटार सायकल नंबर एमएच ४२ एजे ९२५३ असा एकूण किंमत रूपये १,२१,६००/- चा मुद्देमाल मिळून आलेला आहे. सदर आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेविरुद्ध लोणीकाळभोर पोलीस स्टेशनला आर्म अ‍ॅक्ट कलम ३, ४, २५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

दोन्ही आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाई कामी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेले असून दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत अट्टल गुन्हेगार असून त्यांचेविरूध्द लोणीकाळभोर व यवत पोलीस स्टेशन येथे दरोडा, दरोडयाची तयारी, जबरी चोरी, गंभीर दुखापत, बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगणे अशा प्रकारचे एकुण ५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी नक्की कोणत्या कारणांसाठी शस्त्रे बाळगली होती याबाबतचा अधिक तपास लोणीकाळभोर पोलीस स्टेशन करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like