Pune : धारधार शस्त्र दाखवून जबरी चोरी करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखा व लोणीकंद पोलिसांकडून अटक

शिक्रापुर : धारधार शस्त्राचा धाक दाखवत जबरी चोरी करणाऱ्या टोळीला पुणे जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा व लोणीकंद पोलिसांनी जेरबंद केले याबाबतीत पुढील तपास लोणिकंद पोलिसांकडून सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली गावच्या हद्दीतील बकोरी फाटा येथे तीन अज्ञात व्यक्तींनी औरंगाबाद येथे जायचे आहे,असे खोटे सांगून एक ईरटीगा गाडी भाडेतत्वावर मागवली. हे तीनही आरोपी गाडीत बसल्यानंतर ड्रायव्हरला चाकू दोरी आणि कविता गळ्याला लावला त्यानंतर गाडी एका सोसायटीच्या खाली नेहून ड्रायव्हरला जबर मारहाण करत त्याच्या जवळची रक्कम काढून घेतले आणि बँक खात्यातील दहा हजार रुपये गुगल पे मार्फत त्या अज्ञात चोरट्यांनी स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करून घेतले. ड्रायव्हरला जबर मारहाण करीत त्या चोरट्यांनी ईरटीका गाडी घेऊन त्या ठिकाणाहून पळ काढला सदर घटना घडल्यानंतर ड्रायव्हरने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार नोंदवली. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना लोणीकंद पोलिस स्टेशनचे समीर पिलाने आणि दत्ता काळे यांना आरोपी कोरेगाव भीमा येथे असल्याचे कळावे त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणीकंद पोलिस यांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने त्या आरोपींना जेरबंद केले.यासंदर्भात सागर नवनाथ पिंगळे (वय २५),भूषण शरद माळी ( वय १९) आणि विधीसंघर्षित बालक सर्व राहणार वाडा कोरेगाव भीमा येथील असून या तीनही आरोपीकडून इराटीका गाडी ताब्यात घेतली आहे.सागर पिंगळे या आरोपी आणखी जबरी चोरी व खंडणीचे गुन्हे दाखल आहेत.

पुणे जिल्ह्याला नुकतेच लाभलेले पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील,हवेली विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट,लोणीकंद पोलीस स्टेशन पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे,पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पडळकर,पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे,पोलीस उपनिरीक्षक राम दोंडगे(स्थानिक गुन्हे शाखा),पोलीस हवालदार बाळासाहेब साकटे,पोलीस नाईक राजू मोमीन व पोलीस नाईक विजय कांचवन (स्थानिक गुन्हे शाखा),पोलीस नाईक श्रीमंत होनमाने,पो. कॉ. दत्तात्रय काळे,पो.कॉ.संतोष मारकड,पो.कॉ.समीर पिलाने,पो.कॉ. धीरज जाधव( स्था.गु.शाखा),पो.कॉ. सुरज वळेकर,पो.का. ऋषिकेश व्यवहारे यांनी मोठ्या शिताफीने आरोपींना जेरबंद केले.