Pune Rural Police | सराईत राण्या बाणखेले खून प्रकरणातील संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मंचर न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –   मंचर येथे दिवसाढवळ्या एका सराईत गुन्हेगाराचा गोळ्या घालून (firing) खून (Murder) केल्या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) खेड येथून एकाला अटक (Arrest) केली आहे. ही घटना रविवार (दि.1) दुपारी तीनच्या सुमारास मंचर पोलिस स्टेशनच्या (Manchar Police Station) हद्दीत एकलहरे गावच्या हद्दीत घडली होती. ओंकार उर्फ राण्या बाणखेले असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची (Pune Rural Police) पथके तयार करण्यात आली होती.

राम सुरेश जाधव (वय 22, रा. आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
गुन्ह्यातीला आरोपीचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट (Police Inspector Padmakar Ghanwat) यांना गुन्ह्यातील संशयित आरोपी राम जाधव हा
खेड एसटी स्टँड (Khed ST Stand) येथे येणार असून तो परराज्यात पळून जाणार असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी खेड एसटी स्टँड परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
त्याची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी मंचर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (Superintendent of Police Dr. Abhinav Deshmukh), अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील (Additional Superintendent of Police Vivek Patil), उपविभागीय पोलीस अधीकारी लंभाते (Sub-Divisional Police Officer Lambhate) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस उप निरीक्षक अमोल गोरे, रामेश्वर धोंडगे, सहायक फौजदार पठाण, पोलीस हवालदार हनुमंत पासलकर, विक्रम तापकिर, दिपक साबळे, राजू मोमीन, पोलीस नाईक संदिप वारे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले, निलेश सुपेकर, बाळासाहेब खडके, चालक राजापुरे, प्रमोद नवले यांच्या पथकाने केली.

 

Web Title : pune rural police arrest criminal in murder case of ranya bankhele in manchar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Crime News | महिलेने पोलिसाशी घातली हुज्जत, उद्दामपणा दाखवत म्हणाली – ‘शुद्धीत रहा, नाही तर वर्दी उतरवून टाकेन’ (Video)

Pornography | लग्नानंतर स्त्रियांना पॉर्न पाहण्यात अधिक रस; अभ्यासातून माहिती समोर

Pune Municipal Corporation | राज्य सरकारला हाय कोर्टाचा दणका; महानगर नियोजन समितीला दिली स्थगिती