जबरी चोरीच्या गुन्ह्यातील वॉन्टेड LCB च्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जबरी चोरीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीला एलसीबीच्या पथकाने सापळा रचून अटक केली.

सुरेश लक्ष्मण कर्चे (वय 36, रा. गणेश मळा, सिंहगड रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
कर्चे याच्या बारामती तालुका पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला होता. अनेक दिवस पोलीस त्याच्या मागावर होते. परंतु, तो पोलिसांना गुंगारा देत होता.

दरम्यान, पाहिजे आरोपी व सराईतांची माहिती काढण्यात येत आहे. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक पद्माकर घनवट यांना कर्चे याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार, त्यांच्या पथकाने त्याला सापळा रचून पकडले. पुढील कारवाईसाठी त्याला बारामती पोलिसांकडे देण्यात आले आहे.
दरम्यान, कर्चे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर उस्मानाबाद तसेच सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट, सहायक निरीक्षक दत्तात्रय गुंड, कर्मचारी महेश गायकवाड, निलेश कदम, रवि शिनगारे, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, रौफ इनामदार, काशिनाथ राजापुरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.