‘धुम’स्टाईलनं सोनसाखळी चोरी करणारे अटकेत, गजाआड LCB ची कारवाई

 लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे-सोलापूर महामार्गावर अलिकडे धुमस्टाईल सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढल्याने पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेस या गुन्ह्याची उकल करण्यासाठी सूचना केल्या यावर या शाखेच्या विशेष पथकाने या प्रकरणी दोन सराईत सोनसाखळी चोरांना जेरबंद केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीत कुंजीरवाडी येथे एका महिलेचे पंचवीस ग्रॅम वजनाची सोन्याची मोहनमाळ मोटार सायकल वरून येऊन हिसकावून धूम ठोकली अशी तक्रार लोणी काळभोर पोलिस स्टेशन येथे नोंद करण्यात आली. अशा तक्रारी वाढत असल्याने पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेस या गुन्ह्याची उकल करण्यासाठी एक पथक तयार करुन हे गुन्हेगार शोधून काढण्याच्या सूचना दिल्या.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड, सहाय्यक पोलिस फौजदार दत्तात्रय गिरमकर, रौफ इनामदार, राजु मोमीण, धीरज जाधव, अक्षय जावळे, विज कांचन, जनार्दन शेळके यांचे एक पथक तयार केले. या पथकाला या गुन्ह्यात हवे असलेले गुन्हेगार इंदापूर येथील बस स्थानकात येणार असल्याची माहिती एका बातमीदाराकडून मिळाली. यावर या पथकाने तेथे एक सापळा रचला. तेथे दोन संशयीत आल्यावर बातमीदाराने इशारा करताच त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची नावे श्रीकांत विजय पवार व अजय चंद्रकांत सोरटे दोघेही रा. करमाळा जि. सोलापूर   त्याच्याकडे गुन्ह्यासंदर्भात चौकशी केली असता त्यांनी त्याची कबुली केली. त्यांच्याकडून एकुण दोन लाख एकवीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

हे दोघेही सराईत गुन्हेगार असून यांच्यावर भिगवण, यवत तसेच लोणी काळभोर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/