सासवड : आर्थिक अडचणींमुळे दरोडा, सराईत गुन्हेगारांची टोळी गजाआड

सासवड/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पैशांची चणचणीमुळे महाराजा हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांवर कोयत्याने वार करून दरोडा टाकणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ही घटना 27 ऑगस्ट रोजी रात्री 9 च्या सुमारास घडली होती. या घटनेत हॉटेलमधील कामगार प्रशांत वसंत बगाडे आणि प्रथमेश फडतरे हे जखमी झाले आहेत. आरोपींनी हॉटेलमध्ये दरोडा टाकून 16 हजार 700 रुपयांची रोकड आणि दशरथ वाघमारे, गणेश मंगळवेढेकर या कर्मचाऱ्यांचे मोबाइल चोरुन नेले होते.

सागर उर्फ नानूभाई बबलू नाथु (वय- 19), अनिल उर्फ जग्गू प्रमोद सोळंकी (वय -20), सनी भरत पवार (वय – 20, ति रा. खंडोबानगर, विजय क्लासेस समोर, ता. पुरंदर ), विकास उर्फ तर्री जितेंद्र मंडले (वय 20, रा. नायकवाडा, आरती हाईटस् शेजारी, सासवड, ता. पुरंदर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सागर उरसळ यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

स्थानिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा तपास सुरु असताना हा गुन्हा सागर उर्फ नानूभाई नाथू आणि त्याच्या साथिदारांनी केला असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींचा शोध घेत असताना आरोपी खंडोबानगर येथे जमले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकला समजली. पथकाने सापळा रचून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी पैशांची चणचणीमुळे गुन्हा केल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यातील मोबाइल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते, उप विभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोरे, रामेश्वर धोंडगे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत माळी, पोलीस हवालदार चंद्रकांत झेंडे, जगदीश शिरसाठ, राजेंद्र चंदनषिव, पोलीस नाईक राजु मोमीन, गुरू जाधव, पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब खडके, मंगेष भगत, अमोल शेडगे, अक्षय जावळे यांच्या पथकाने केले.