Pune Rural Police | पुणे आणि नगर जिल्ह्यात दुचाकी चोरणारी दुकली गजाआड; 4 लाखांच्या 11 दुचाकी जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील (Pune district) ग्रामीण भागात आणि नगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी (Officers and staff of the local crime branch) अटक (Arrest) केली आहे. आरोपींकडून 4 लाख 10 हजार रुपये किमतीच्या 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई रविवारी (दि.13) जुन्नर (Junnar) तालुक्यातील खोडद या गावात करण्यात आली.

सिद्धार्थ रमेश बर्डे (वय 21 रा. खोडद ता. जुन्नर जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण आणि नगर जिल्ह्यात (Pune Rural and Ahmednagar District) दुचाकी चोरीचे (Bike theft) प्रामाण वाढले आहे. दुचाकी चोरांचा शोध घेत असताना, जुन्नर तालुक्यातील खोदड येथे काही तरुण काहीही कामधंदा करत नसताना वेगवेगळ्या दुचाकीवर फिरत असल्याची माहिती मिळाली.

 

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खोडद येथे सापळा रचला.
पोलिसांचा सुगावा लागताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.
परंतु पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना पकडले.
त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत आरोपींनी 11 दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
या दुचाकी पुणे आणि नगर जिल्ह्यातून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपींनी चोरलेल्या दुचाकीपैकी 8 गुन्हे उघडकीस आले आहेत.
पुढील कारवाईसाठी आरोपींना नारायणगाव पोलीस स्टेशनच्या (Narayangaon Police Station) स्वाधिन करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख (Superintendent of Police Abhinav Deshmukh), उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे (Sub-divisional police officer near Mandar) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक (Senior Police Inspector of the Local Crime Branch) पद्माकर घनवट यांचे आदेशाने व सुचने नुसार सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस हवालदार विक्रम तापकीर, सचिन गायकवाड, पोलीस नाईक दीपक साबळे, पोलीस शिपाई संदीप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, मुकुंद कदम यांच्या पथकाने केली.

Wab Title :- Pune rural police arrested two criminals

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pan Card Online Application | डॉक्युमेंटची गरज नाही, फक्त 10 मिनिटांत बनवा Pan Card, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

सिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी Adani Cement

येथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50 लाखांची ‘ही’ सुविधा सुद्धा Free

Coronavirus : भारतातील कोरोना मृत्यूंचा आकडा चुकीचा, प्रत्यक्षात 7 पट जास्त मृत्यू? सरकारने मॅग्झीनचा दावा फेटाळला

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा