गावठी दारूची वाहतूक करणाऱ्यास पकडले, ५ लाख ५० हजाराचा माल हस्तगत LCB ची धडक कारवाई

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील बोरीऐंदि येथे गावठी दारू विक्रीसाठी आणणाऱ्या इसमास Lcb पथकाने सापळा रचून पकडले आहे. या इसमाकडून गावठी दारूचे ३५ लिटरचे तब्बक २५ कॅन यावेळी हस्तगत करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २३ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ०६.३० वा. यवत पोलीस स्टेशन हद्दीत बोरीऐंदी, दौडकर मळा रोड, ता. दौंड जि. पुणे येथे सापळा रचून बोरीऐंदी कडे भरधाव वेगात येणाऱ्या महिंद्रा पिकअप जीपला अडथळा करून आरोपी चालक नितेश भालसिंग राठोड वय १९ वर्षे रा. डाळिंब ता. दौंड जि. पुणे यास पळून जाताना ताब्यात घेवून महिंद्रा पिकअप जीप नंबर एमएच ४२ एम ८८०६ चे पाठीमागील हौदयात ३५ लिटरचे एकूण २५ कॅनमध्ये विक्री करणेसाठी वाहतुक करीत असलेली अवैध हातभट्टी तयार दारू ८७५ लिटर व महिंद्रा पिकअप सह किं. रू. ५,५०,०००/- असा माल जप्त करणेत आलेला आहे.

जप्त मुद्देमाल व आरोपी यास पुढील कारवाईसाठी यवत पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे. यातील आरोपी हा सराईत असून पहाटे सकाळच्या वेळी पोलीसांची रात्रगस्त संपलेवर पिकअप जीपमध्ये गावठी दारूने भरलेले कॅनवर भाजीपाल्याचे मोकळे कॅरट ठेवत असल्याने त्याचा कोणालाही संशय येत नसायचा.त्यामुळे सदर इसम बिनधास्त पणे गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करायचा.

पुणे ग्रामीण जिल्हयात अवैध धंदयावर कारवाई करणेसाठी पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले गुन्हे शाखेचे पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, महेश गायकवाड, निलेश कदम, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, शरद पोफळे यांचे पथकाने ही कारवाई केली.

Visit – policenama.com