Pune Rural Police | शेतात अफूची लागवड, ग्रामीण पोलिसांकडून दोन शेतकऱ्यांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Rural Police | शेतात अफूची लागवड करणाऱ्या दोन शेतकऱ्यांना ग्रामीण पोलिसाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई पुरंदर तालुक्यातील कोडीत गावात 24 फेब्रुवारी रोजी करण्यात आली. या कारवाईत 21 हजार रुपये किमतीची 10 किलो 500 ग्रॅम वजनाची अफूची ओली बोंडे जप्त करण्यात आली आहेत.(Pune Rural Police)

दशरथ सिताराम बडधे (वय-65) व तान्हाजी निवृत्ती बडधे (वय-69 दोघे रा. कोडीत बु. ता. पुरंदर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर सासवड पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

एलसीबीचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना माहिती मिळाली की, पुरंदर तालुक्यातील कोडीत गावातील दशरथ बडधे व तान्हाजी बडधे यांनी त्यांच्या शेतात बेकायदेशीरपणे अफूची लागवड करुन उत्पादन घेत आहेत. च्या पार्श्वभूमीवर पथकाने सासवड व राजगड पोलिसांच्या मदतीने कोडीत गावातील मलाईवस्ती येथे गेले. त्याठिकाणी दोन वेगवेगळ्या शेतात जावून पाहणी केली असता आरोपींनी अफूची लागवड केल्याचे आढळून आले. अफूची लागवड केल्याचे दिसू नये यासाठी त्यांनी शेतात कांदा व शेवंती फुलांची लागवड केली होती.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव,
उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत पांडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,
राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी, एससीबीचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे,
पोलीस अंमलदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजय कांचन, योगेश नागरगोजे, धिरज जाधव, दगडु विरकर,
सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार सुरज नांगरे, जब्बार सय्यद, प्रतिक धिवार, कारंडे, भुजबळ यांच्या पथकाने केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकले करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | खडकी परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेरांना अटक, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Congress-Mohan Joshi | झोपडीधारकांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी व्हावे अन्यथा आंदोलन करू – माजी आमदार मोहन जोशी

Takalkar Classes Tilak Road | पोलिसांच्या मुला-मुलींसह नातेवाईकांसाठी खूशखबर ! टाकळकर क्लासेस टिळक रोड शाखेमध्ये अ‍ॅडमिशन सुरू; 8 वी, 9 वी, 10 वी CBSE व SSC बोर्डासाठी तसेच 11 वी, 12 वी सायन्स विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत