Pune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर विक्री करणार्‍या दौंड आणि यवत येथील दोघांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   कोरोनामुळे प्रादुर्भावामुळे ऑक्सिजनची मागणी (Demand for oxygen) मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचाच फायदा घेऊन रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा करणार्‍या दौंड आणि यवत (Daund and Yavat) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोघांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) सोमवारी (दि. 14) कारवाई केली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

सचिन गोपाळराव चांदेकर (रा. श्रीहरी अपार्टमेंट, प्लॅट नं. 2, विठ्ठल मंदिरासमोर दौंड) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे.
दौंड पोलिसांनी (Daund Police) दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे श्रीनाथ इंटरप्रायजेस या नावाने दुकान आहे.
या दुकानातून तो मेडिकल ऑक्सिजन सिलेंडरची खरेदी- विक्री करत होता.
आरोपीने गेल्या काही दिवसात खरेदी- विक्री केलेल्या सिलेंडरची पोलिसांनी कागदपत्रे तपासली असता त्याने जादा किंमत आकारून रुग्णालयांना विक्री केल्याचे आढळले.
त्यामुळे दौंड पोलिस ठाण्यात (Daund Police Station) आरोपीवर औषध किंमत नियंत्रण आदेश 2013 सह, जिवनावश्यक वस्तूचे अधिनियम उल्लंघन तसेच विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दौंड पोलिस (Daund Police) तपास करत आहेत.

Royal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट, कंपनीचा आहे हा प्लॅन

तर दुस-या घटनेत यवत पोलीस ठाण्याच्या (yavat police station) हद्दीत विना परवाना मेडिकल ऑक्सिजनची रुग्णालयांना विक्री केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
नवनाथ महादेव बनवडे (रा. तामखडा पाटस, ता. दौंड, जि. पुणे) असे गुन्हा (FIR) दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे.
यवत पोलिसांनी (yavat police) दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे पाटस येथे नागेश्वर गॅस सप्लायर या नावाचे दुकान आहे.
आरोपीने लॉकडाऊन काळात शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून अन्न व औषध प्रशासनाचा कोणताही परवाना नसताना दौंड तालुक्यातील गुरुदत्त इंटरप्रायजेस यांच्याकडून मेडिकल ऑक्सिजन भरलेले सिलेंडर खरेदी करून तालुक्यातील विविध रुग्णालयांना जादा दराने विक्री केल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे त्याच्यावर औषध किंमत नियंत्रण आदेश 2013 सह, जिवनावश्यक वस्तूचे अधिनियम उल्लंघन तसेच विविध कलमान्वये यवत पोलीस ठाण्यात (yavat police station) गुन्हा दाखल केला आहे.

पुढील आठवड्यात लाँच होणार Hyundai Creta चे 7 सीटर व्हर्जन, जाणून घ्या पूर्ण डिटेल्स

विना मास्क फिरणा-या नागरिकांवर कारवाई, 3 लाखांचा दंड वसूल

दरम्यान जिल्ह्यात विनामास्क फिरणा-या बेजबाबदार 708 नागरिकांवर कारवाई करून त्यांच्याकडून 3 लाख 15 हजार 800 रुपयांचा दंड पुणे ग्रामीण पोलीसांनी (Pune Rural Police) वसूल केला आहे.
कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नाही.
तरही अनेक ठिकाणी सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येत आहे.
तसेच अनेकजण ‍विनामास्क फिरतांना दिसतात ही बाब घातक आहे.
त्यामुळे पोलिसांनी बेजबाबदारीने स्वत:चे आणि समाजाचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कारवाई केली आहे.
पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख (Superintendent of Police Dr. Abhinav Deshmukh) यांच्या आदेशनुसार पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली आहे.

Web Title : Pune Rural Police | Daund and Yavat accused of selling oxygen cylinders to hospitals at inflated rates

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pune News | पुणे विभागात म्हाडाच्या घराला प्रचंड प्रतिसाद; 3 हजार घरांसाठी 57 हजार आले अर्ज