Pune Rural Police | शौर्यदिनानिमित्ताने पुणे ग्रामीण पोलिसांना ‘हे’ अधिकार प्राप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Rural Police | नववर्षाचे स्वागत करण्याकरिता 31 डिसेंबर रोजी पर्यटकांची होणारी गर्दी आणि पेरणे फाटा येथे 1 जानेवारीला विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण (Pune News) भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व सर्व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना विविध अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. हे अधिकार 25 डिसेंबर 2022 ते 7 जानेवारी 2023 रोजीच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पोलिसांकडे असतील. सदर अधिकार पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 च्या अधिकारान्वये पोलीस अधिकार्‍यांना प्रदान केले आहेत. (Pune Rural Police)

पोलिसांना मिळालेल्या अधिकारांमध्ये, मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांना वर्तणूक कशी ठेवावी, याविषयी निर्देश देणे, अशा कोणत्याही मिरवणुकीचा मार्ग आणि वेळ ठरविणे, सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी तसेच उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याची शक्यता असेल, तर अशा सर्व प्रसंगी अडथळा टाळण्यासाठी आदेश देण्याचे अधिकार पोलीस अधिकार्‍यांना दिले आहेत. (Pune Rural Police)

त्याशिवाय, सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ते आदेश देणे आणि ढोल, ताशा व इतर वाद्य
व गाण्याचे, शिंगे व इतर वाद्ये वाजविण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना त्रास होऊ नये, म्हणून ध्वनिक्षेपकाचा (लाऊड स्पीकर) उपयोग करण्यावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकारही पोलिसांना देण्यात आले आहेत.

Web Title :- Pune Rural Police | empowerment of police officers pune rural police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

SPPU News | पुणे विद्यापीठात भोजनासाठी विद्यार्थ्यांना जादा पैसे मोजावे लागणार

India Australia Women T20 Series | भारत-ऑस्ट्रेलिया महिला ट्वेन्टी-20 मालिका आजपासून; कोण करणार विजयी सुरुवात?

Radhakrishna Vikhe-Patil | 3 हजार 110 तलाठी पदांची भरती प्रक्रिया लवकरच – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील