Pune Rural Police | गुंड गणेश रासकर खुन प्रकरणात फलटणच्या गौरव लकडेला अटक, मिरेवाडी शिवारातील ऊसात होता लपला

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Rural Police | पुरंदर तालुक्यातील (Purandar taluka) नीरा (Neera) येथील कुख्यात गुंड गणेश रासकर याच्या खून प्रकरणातील (Criminal Ganesh Raskar Murder Case) मुख्य आरोपी गौरव जगन्नाथ लकडे (Gaurav Lakde) (वय -24 रा.मिरेवाडी, ता.फलटण) याला अटक करण्यात जेजुरी व नीरा पोलिसांना (Jejuri Police of Puen Rural) यश आले आहे. खुनाच्या गुन्ह्यात वापरलेली गावठी पिस्तूल (Pistol) व मॅक्झिनही जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 30 तारखेपर्यंत पोलिस कोठडी (police custody) दिली आहे. Pune Rural Police | Gaurav Lakde of Phaltan arrested in Ganesh Raskar murder case, was hiding in sugarcane in Mirewadi Shivara

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, पुरंदर तालुक्यातील नीरा येथील कुख्यात गुंड गणेश रासकर याचा एकेकाळचा साथीदार गौरव लकडे याने त्याचा साथीदार निखिल ढावरे याच्या मदतीने
रासरकरचा खून केला होता. ही घटना 16 जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमारास
नीरा येथील बसस्थानकाजवळील एका दुकानासमोर घडली होती.
आरोपींनी गुंड गणेश रासकर याच्या डोक्यात व जबड्यावर जवळून गोळीबार करून खुन केला होता.

गुन्ह्यातील 3 आरोपींना यापूर्वीच अटक

हा गुन्हा घडल्यानंतर छत्तीस तासाच्या आत निखिल ढावरे (रा.पाडेगांव, ता.फलटण) तसेच कटामध्ये सामील असणारा गणेश जाधव (रा.नीरा , ता.पुरंदर) व आरोपीला पिस्टल व काडतूस विकणारा
संकेत कदम (रा लोणी, ता.खंडाळा) यांना पोलिसांनी अटक (Arrest) केली होती.
परंतु कुख्यात गुंड गणेश रासकर खुनातील मुख्य आरोपी गौरव जगन्नाथ लकडे हा पोलिसांना गुंगारा देत होता.

ऊसाच्या शेताला घेराव घालून केली अटक

मुख्य आरोपी गौरव लकडे याला पकडण्यासाठी सातारा, सांगली, पंढरपूर या ठिकाणी
वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली होती. परंतु तो पोलिसांना मिळत नव्हता.
लकडे हा गुन्हा केल्यापासून लोणंद पोलीस स्टेशनच्या (Lonand Police Station) हद्दीतील त्याच्या मिरेवाडी (ता.फलटण) गावातील शिवारात ऊसामध्ये लपून बसला असल्याची गोपनीय माहिती
जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक धर्मवीर खांडे (Dharmaveer Khande) यांना सोमवारी (दि.26) रात्री दहा वाजता मिळाली. त्यानुसार पोलिसांची पथके तयार करण्यात आली.
पोलिसांच्या पथकांनी मिरेवाडी परिसरातील ऊसाला चारही बाजूने घेराव घालून
मुख्य आरोपी गौरव जगन्नाथ लकडे याला ताब्यात घेतले.
सदर आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली गावठी पिस्तूल व मॅक्झिन पोलिसांनी जप्त केले.
आरोपीने पिस्तूल व मॅगक्झिन त्याच्या शेतातील जुन्या घरात लपवून ठेवले होते.

गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करणार

जेजुरी पोलीस स्टेशनचे (Jejuri Police Station) पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक (Police Inspector Sunil Mahadik) यांनी सांगितले, नीरा येथील कुख्यात गुंड गणेश रासकर
खुन प्रकरणातील मुख्य आरोपी गौरव लकडे याला अटक कली आहे.
नीरा येथील एका गुंडाचा खात्मा झाला असून यापुढे आणखी टोळी तयार होऊ नये
याकरिता पोलिस आरोपींवर कडक शासन होईल यादृष्टीने गुन्ह्याचा शास्ञोक्त तपास करणार आहे.

ही कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख (Superintendent of Police Dr. Abhinav Deshmukh), अपर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते (Additional Superintendent of Police Milind Mohite), उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील (Sub-Divisional Police Officer Dhananjay Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरीचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक,
सहाय्यक फौजदार महादेव कुतवळ, पोलीस हवालदार विठ्ठल कदम,
पोलीस नाईक धर्मवीर खांडे,
पोलीस हवालदार संदीप कारंडे, संदीप मोकाशी तसेच नीरा पोलीस दुरक्षेत्राचे
फौजदार कैलास गोतपागर, नंदकुमार सोनवलकर, सहाय्यक फौजदार सुरेश गायकवाड,
सुदर्शन होळकर, पोलिस नाईक राजेंद्र भापकर, पोलीस शिपाई निलेश जाधव ,
प्रवीण शेंडे, हरिचंद्र करे, चालक पोलीस शिपाई भानुदास सरक,
संजय ढमाळ यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Rural Police | Gaurav Lakde of Phaltan arrested in Ganesh Raskar murder case, was hiding in sugarcane in Mirewadi Shivara

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation | शहरातील रस्त्यांवरील खड्डयांची जबाबदारी आमचीच – स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने

Health Tips | चुकूनही खाण्याच्या ‘या’ 5 गोष्टी शिजवून खाऊ नका, फायद्याऐवजी होईल नुकसान; जाणून घ्या

Pune Corporation | यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम : महापौर मुरलीधर मोहोळ