Pune Rural Police | पुण्यातील रोपवाटिकेतील गावठी दारुचा अड्डा उध्वस्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Rural Police | पुणे-सोलापूर महामार्गावरील ऊरळी कांचन परिसरात एका रोपवाटिकेत गावठी दारु तयार करण्यात येत असल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पोलिसांनी रोपवाटिकेत छापा टाकून साडेनऊ हजार लिटर गावठी दारु, रसायन असा एकूण 6 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सोमवार (दि. 26) रोजी करण्यात आली आहे. याचबरोबर सोरतापवाडी, शिंदवणे परिसरातही अशीच कारवाई करुन दोन लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.(Pune Rural Police)

याप्रकरणी रोपवाटिका चालक राजेंद्र चौधरी आणि जमीन मालकाविरुद्ध ऊरळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. ऊरळी कांचन परिसरातील कोरेगाव या गावात एका रोपवाटिकेत राजेंद्र चौधरी गावठी दारु तयार करुन,
ती दारू ओळखीच्या लोकांना विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी सहा लाख 87 हजार रुपये किंमतीचे नऊ हजार लिटर रसायन नष्ट केले.

याशिवाय पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी परिसरात शिंदवणे गावातील कालव्याजवळ बेकायदा गावठी दारु
तयार करुन त्याची विक्री केली जात असल्याची माहित पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकून पाच हजार लिटर रसायन, 525 लिटर दारु असा दोन लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक शंकर पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे, सचिन जगातप, मनीषा कुतवळ, प्रमोद गायकवाड यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Congress-Mohan Joshi | झोपडीधारकांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी व्हावे अन्यथा आंदोलन करू – माजी आमदार मोहन जोशी

Takalkar Classes Tilak Road | पोलिसांच्या मुला-मुलींसह नातेवाईकांसाठी खूशखबर ! टाकळकर क्लासेस टिळक रोड शाखेमध्ये अ‍ॅडमिशन सुरू; 8 वी, 9 वी, 10 वी CBSE व SSC बोर्डासाठी तसेच 11 वी, 12 वी सायन्स विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत