Pune Rural Police | डेंग्यूमुळे बारामतीच्या महिला पोलिसाचा पुण्यात मृत्यू, दहा दिवसांचे बाळ झालं पोरकं

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Rural Police | बारामती शहर पोलीस ठाण्यातील (Baramati City Police Station) महिला पोलीस कर्मचाऱ्याचा (Female Police Officer) डेंग्यू आजाराने (Dengue Disease) आज (मंगळवार) पहाटे मृत्यू झाला. शीतल जगताप गलांडे (Sheetal Jagtap Galande) असे या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. शीतल यांच्यावर पुण्यातील केईएम रुग्णालयात (KEM Hospital) उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू (Death) झाला. त्यांच्या निधनामुळे अवघ्या दहा दिवसांचे बाळ पोरकं झालं आहे. शितल यांच्या मृत्यूची बातमी समजताच पोलीस दलात (Pune Rural Police) हळहळ व्यक्त होत आहे.

शीतल या प्रसूती रजेवर (Maternity Leave) गेल्या होत्या.
दहा दिवसांपूर्वी त्यांनी गोंडस बाळाला जन्म दिला होता. प्रसुतीनंतर त्यांना डेंग्यू आजाराची लागण झाली.
त्यांना उपचारासाठी केईएम रुग्णालायत दाखल करण्यात आले होते.
मात्र, उपचार सुरु असताना आज पहाटे त्यांचे निधन झाले.

शीतल या शहर पोलीस ठाण्यात (Pune Rural Police) संगणकीय प्रणालीचे (Computer System) कामकाज पाहत होत्या. प्रसूतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्या पोलीस ठाण्यात दैनंदिन कामकाज पाहत होत्या.
पोलीस दलाचे शिस्तप्रिय व जोखमीचे आणि शरीराचा कस लागणारे काम त्या करत होत्या.
त्यांच्या पश्चात पती एक मुलगी व दहा दिवसांपूर्वी जन्मलेले बाळ असा परिवार आहे.
त्यांच्यावर शासकीय इतमामात पणदरे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सप्टेंबरमध्ये पुण्यात डेंग्युचे प्रमाण वाढले

पुणे शहर आणि परिसरात सध्या मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत असल्याने सप्टेंबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
या महिन्यात शहराच्या हद्दीत डेंग्यूच्या 41 रुग्णांची नोंद झाली असून डेंग्यूचे 509 संशयित रुग्ण आढळून आले आहेत.
पुणे महापालिका हद्दीमध्ये डेंग्यूमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Web Title :- Pune Rural Police | lady police officer who delivers baby ten days ago dies of dengue in baramati pune rural police dept

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | NDA त लष्करी अधिकारी असल्याचे भासविणारा तोतया पोलिसांच्या जाळ्यात; इव्हेंट मॅनेजमेंट करणार्‍याने लष्करी गणवेश घालून केला फसवणुकीचा प्रयत्न

Sanjay Raut On Shivsena Dasara Melava | “परवानगी मिळाली नाही तरी शिवसैनिकांनी…” दसरा मेळावा वादात संजय राऊतांची उडी