उरुळी कांचनमध्ये आणखी एकास गावठी पिस्तुलासह अटक, LCBची कारवाई

लोणी काळभोर : पोलिसनामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुरक्षितता कायम रहावी यासाठी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी अवैध रित्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर कारवाई करण्याची सूचना दिली. त्यावर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून उरुळी कांचन परिसरात एका इसमाकडून एक गावठी पिस्तुल दोन जीवंत काडतूसे हस्तगत केले असून पुढील तपासासाठी त्यास लोणी काळभोर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

उरुळी कांचन गावात एक इसम गावठी कट्टा घेऊन येत असल्याचे एका बातमीदाराकडून माहिती मिळाली त्यावर पोलिस अधिक्षक संदीप पाटील व गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक उरुळी कांचन येथे पोहोचले. कस्तुरी गार्डन कार्यालयाजवळ फिरताना दिसला त्यास या पथकाने हटकले असता पळून जाण्याच्या स्थितीत असताना ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तुल व दोन जीवंत काडतुसे अढळून आली. त्याची चौकशी केली असता त्याचे नाव संदीप उर्फ रामा बापू वाघ (रा.चारवाडा मांजरी ता.हवेली)असे असल्याचे सांगितले. त्यास ताब्यात घेऊन पुढील तपासकामी लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण चे दत्तात्रय गुंड (सहाय्यक पोलिस निरीक्षक), दत्तात्रय गिरमकर, दयानंद लिमण, सचिन गायकवाड, अक्षय जावळे, धीरज जाधव, जनार्दन शेळके, दयानंद लिमण, विजय कांचन यांनी सहभाग घेतला.

Visit : policenama.com