Pune Rural Police | लोणावळा: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून गांजाची तस्करी करणारी टोळी गजाआड; 48 किलो गांजासह 14 लाखांचा मुद्देमाल जप्त (Video)

Pune Rural Police | Lonavala: Ganja smuggling gang on old Pune-Mumbai highway Gajaad; 14 lakh worth of goods seized including 48 kg of ganja (Video)
ADV

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Rural Police | जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Old Pune Mumbai Highway) गांजाची तस्करी (Ganja Smuggling) करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी पुण्याहून खोपोली येथे गांजा घेऊन जात असताना ही कारवाई केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.11) पहाटे तीनच्या सुमारास जुना पुणे-मुंबई महामार्गावरील कार्ला फाटा येथील तेजस ढाब्यावर करण्यात आली. आरोपींकडून 48 किलो गांजासह 14 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक (IPS Satya Sai Karthik) यांनी दिली.

नितीन शिवाजी लेहने (वय 38 रा. औरंगपूर तालुका शिरूर जिल्हा बीड), संदिपान पाटलोबा गुट्टे (वय 39 रा. परळी वैजनाथ, तालुका परळी, जिल्हा बीड), गणेश सुरेश दराडे (वय 30 रा. केज, तालुका केज, जिल्हा बीड) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून लोणावळा विभागात अमली पदार्थांची चोरून विक्री होत असुन त्यामुळे परिसरातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यासाठी ‘संकल्प नशामुक्ती’ अभियान हाती घेऊन त्याअंतर्गत परिसरातील युवकांमध्ये जनजागृती करणे, तसेच अमली पदार्थांचे सेवन, साठवणुक व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. ‘संकल्प नशामुक्ती’ अभियानाचाच एक भाग म्हणून मावळ परिसरातील अमली पदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात गेल्या काही दिवसात कठोर कायदेशीर कारवाया करून अनेक आरोपींना गजाआड करून त्यांचेकडून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त केला आहे.

गुरुवारी (दि.11) माहिती मिळाली होती की, लोणावळा भागातील कार्ला फाटा परिसरात काही इसम हे चारचाकी वाहनांमधून गांजा विक्रीकरिता घेऊन येणार आहेत. त्यानुसार मध्यरात्रीपासूनच कार्ला फाटा परिसरात सापळा रचण्यात आला होता. पहाटे तीनच्या सुमारास जुने मुंबई पुणे हायवे रोडवरील तेजस ढाब्याच्या समोर एक संशयित वाहन थांबले. पथकाने गाडीतील व्यक्तींकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांच्यावर संशय बळावल्याने पोलीस पथकाने गाडीतील तिघांची झडती घेतली. तसेच चारचाकी वाहनाचे डिक्कि तपासली असता त्यामध्ये दोन पोत्यांमध्ये 9 लाख 20 हजार रुपये किमतीचा 48 किलो गांजा मिळून आला.

आरोपींकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये हा गांजा विक्रीकरीता खोपोली येथे घेऊन जात असल्याचे सांगितले. या कारवाईमध्ये 48 किलो गांजा, चारचाकी वाहन, मोबाईल असा एकूण 14 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींवर लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी सरकारतर्फे फिर्यादी दिली आहे. त्यावरुन एन.डी.पी.एस ॲक्ट 1985 चे कलम 8(क), 20(ब) (क), 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे हे करत आहेत.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस अंमलदार नितेश (बंटी) कवडे, अंकुश नायकुडे, दत्ता शिंदे, गणेश येळवंडे, सुभाष शिंदे, महेश थोरात यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IAS Puja Manorama Dilip Khedkar | IAS पूजा खेडकर आई मनोरमा खेडकर, वडील दिलीप खेडकर यांच्यासह 5 जणांविरुद्ध गुन्हा

PMC Health Department News | पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकार्‍यांची ‘कारवाईतून’ वाचण्यासाठी धडपड ! अधिकार नसताना सहाय्यक आरोग्य प्रमुखांनी लेखा विभागाला पाठविलेली

Total
0
Shares
Related Posts