Pune Rural Police – Marathon Race In Lonavala | पुणे ग्रामीण पोलिसांतर्फे लोणावळ्यात मॅरेथॉनचे आयोजन; अभिनेता सुनील शेट्टी होणार सहभागी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Rural Police – Marathon Race In Lonavala | शहरात दिवसेंदिवस तरुणांमध्ये ड्रग्ज (Drugs Case) घेण्याचे प्रमाण वाढत आहे. खास करून सहलीला जाण्याच्या ठिकाणी हे प्रमाण जास्त दिसून येते. यावर नियंत्रण आणण्यासाठी आणि तरुणांमध्ये याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांमार्फेत (Pune Rural Police) ‘संकल्प नशा मुक्ती’ (Sankalp Nasha Mukti) अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत रविवारी लोणावळा शहरात (Lonavala City) विशेष मॅरेथॉनचे (Pune Rural Police – Marathon Race In Lonavala) आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचा चेहरा म्हणून प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी Lonavala Sub Divisional Police Officer (Lonavala SDPO) सत्य साई कार्तिक (IPS Satya Sai Kartik) यांनी दिली आहे.

 

पर्यटनाच्या निमित्ताने लोणावळ्यामध्ये अनेक तरुण मंडळी येत असतात. त्यामुळे या शहरात ड्रग्जचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. यावर आळा घालण्यासाठी पुणे पोलिस अधीक्षक अंकित गोयल (IPS Ankit Goyal) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण पोलिसांनी ‘संकल्प नशा मुक्ती’ हे विशेष अभियान राबवले आहे. या अभियानांतर्गत तरुणांचे प्रबोधन करणे, व्यसनाच्या आहारी गेलेल्यांचे पुनर्वसन करणे आणि गुन्हेगारांवर कारवाई करणे अशा टप्प्यात काम केले जाणार आहे. या अभियानाचे ब्रँड अॅम्बेसेडर (Brand Ambassador) म्हणून अभिनेता सुनील शेट्टी तरुणांचे प्रबोधन करण्याचे काम करेल. (Pune Rural Police – Marathon Race In Lonavala)

 

या अभियानांतर्गत रविवारी (४ जून) लोणावळा शहरामधील दाऊदी बोहरा ग्राउंड (Dawoodi Bohra Ground, Lonavala) येथे सकाळी 6 वाजता या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी तीन गट पाडलेले असून पहिल्या गटात वय वर्षे १६ ते १८. दुसरा गटात वय वर्षे १९ ते २५ आणि तिसऱ्यामध्ये वय वर्षे २५ च्या पुढील लोकांचा समावेश असेल. या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी रजिस्ट्रेशन (Registration For Lonavala Marathon) करणे गरजेचे आहे. रजिस्ट्रेशनसाठी पुणे ग्रामीण पोलिसाच्या वेबसाईटवर लिंक देण्यात आली आहे. रजिस्ट्रेशन हे विनामुल्य असून स्पर्धेसाठी आलेल्या प्रत्येक स्पर्धकाला टी-शर्ट आणि रिफेशमेंट दिले जाणार आहे. रजिस्ट्रेशनसाठी https://puneruralpolice.gov.in/https://registrations.indiarunning.com/sankalp-nasha-mukti-marathon-2023 या लिंकचा वापर करावा.

Advt.

या अभियानावर पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले आहेत की, ड्रग्ज म्हणजे तरुणाईला लागलेली कीड आहे, त्यातून त्यांची सुटका करणे
आणि त्या व्यसनाच्या जाळ्यात अडकण्यापासून तरुणाइला रोखणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
त्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसानी संकल्प नशामुक्ती’ हे अभियान सुरु आहे त्यासाठी अभिनेता सुनील शेट्टी इनिशियेटिव्ह घेत आहेत
आपण सर्वांनीही यात सहभागी व्हावे आणि रविवारी होणाऱ्या मॅरेथॉन मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी लोकांना केले आहे.

 

Web Title :  Pune Rural Police – Marathon Race In Lonavala | Organization of Marathon in Lonavala by
Pune Rural Police; Actor Suniel Shetty will participate

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा