Pune Rural Police | शिक्रापूर परीसरातील खंडणीखोर वैभव आदकवर अखेर ‘मोक्का’

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Rural | शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन (Shikrapur Police Station) हद्दीमध्ये असलेल्या एमआयडीसी (MIDC) परिसरात कंपनी व्यवस्थापकांना हत्याराचा धाक दाखवून खंडणी (Ransom) उकळणाऱ्या सराईत गुन्हेगार वैभव संभाजी आदक याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने हत्यारांसह अटक (Arrest) केली. त्याच्यावर अनेक खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी आदक याच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अर्थात मोक्का (MCOCA Acction) Mokka कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक तरुण हातामध्ये तलवार घेऊन दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या (Shikrapur Police Station) अधिकाऱ्यांना समजली. पोलिसांनी शिक्रापूर-तळेगाव रोडवरुन आरोपी वैभव आदक (वय 23 वर्षे सध्या रा. शिक्रापूर ता. हवेली जि. पुणे मूळ रा. पठारे वस्ती अष्टापूर ता. हवेली जि. पुणे) याला ताब्यात घेतले. तपसादरम्यान त्याच्यावर चार खंडणी, हाणामारीचे गुन्हे असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी सराईत गुन्हेगार असून पोलिसांनी त्याच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. त्यावर मोक्का अंतर्गत कारवाईला मंजूरी मिळाली असून पुढील तपास दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस (Daund Sub-Divisional Police Officer Rahul Dhas) हे करत आहे.

 

कोणाकडे खंडणी मागितली असल्यास संपर्क करा

शिक्रापूर पोलिसांनी कारवाई केलेला वैभव आदक हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून कंपन्यांच्या व्यवस्थापकांना खंडणी मागणे,
धमकावणे अशी त्याची सवय असून परिसरातील कोणाची याबाबत तक्रार असेल अथवा कोणाकडे खंडणी मागितली असेल
तर शिक्रापूर पोलिसांशी संपर्क साधावा अथवा 9923600017 या क्रमांकावर संपर्क करावा
असे आवाहन पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे (Police Inspector Hemant Shedge) यांनी केले आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे (API Nitin Atkare), विक्रम साळुंके, पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर (PSI Kiran Bhalekar), पोलीस हवालदार अमरदिन चमनशेख, जितेंद्र पानसरे, सचिन होळकर, पोलीस नाईक अमोल दांडगे, संतोष होनमाने, विकास पाटील, सागर कोंढाळकर, शिवाजी चितारे, संतोष शिंदे, जयराम देवकर, पोलीस शिपाई लक्ष्मण शिरसकर, निखिळ रावडे, किशोर शिवणकर, अमोल नलगे, राहुल वाघमोडे यांनी केली.

Web Title :- Pune Rural Police | Mcoca on Vaibhav Adak, a ransom seeker from Shikrapur area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Rural Police | शिरूर येथील एटीएम चोरीचा गुन्हा उघडकीस; 3 आरोपींकडून 5 चोरीचे गुन्हे उघडकीस

Gold Silver Price Today | सोनं 210 रुपये तर चांदीच्या किंमतीत 400 रुपयांची घसरण; जाणून घ्या आजचे नवे दर

Pune Crime | पुण्यातील निलंबीत पोलिसावर खुनी हल्ला, दोघे ताब्यात तर 9 जणांविरूध्द FIR