Pune Rural Police | लोणावळा, मुळशी, सिंहगड ठिकाणी फिरणार्‍या पर्यटकांवर पुणे ग्रामीण पोलिसांची ‘दंडात्मक’ कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  गेले दोन महिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यात कडक निर्बंध लागू केले होते. मात्र, सध्या रुग्णाच्या संख्येत घट पाहता निर्बंध शिथिल केले आहेत. परंतु अजूनही पर्यटन (tourists) स्थळांना ग्रामीण भागात परवानगी देण्यात आली नाही. अशातच सुट्टीचा दिवस साधून (रविवार) पुण्यातील लोणावळा, मुळशी आणि सिंहगड या ठिकाणी लोक मोठ्या संख्येने फिरण्यास येत आहेत. तर याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांवर पुणे  ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) दंडात्मक कारवाई केली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

लोणावळा, मुळशी, सिंहगड परिसरात फिरण्यास येणाऱ्या पर्यटकांवर रविवारी (दि.13) या दिवशी पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.
रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेक लोक फिरण्यास बाहेर पडले आहेत.
लोणावळा ठिकाणी रविवारीच्या दिवशी सकाळच्या दरम्यान फिरण्यास येणाऱ्यांची संख्या अधिक होती.
वाहनांची रंग लागली होती यामुळे वाहतूकही भरगच्च कोंडी झाली होती.
याचबरोबर भुशी धरण, पवन मावळ, आंदर मावळ या ठिकाणी देखील पर्यटकांची गर्दी झाली होती.
तसेच, सिंहगड, पानशेत आणि खडकवासला धरण या ठिकाणीही भरगच्च पर्यटकांची गर्दी बघायला मिळाली.
मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) पर्यटकांकडून दंड वसुली करून पर्यटकांना माघारी पाठवण्यात आले.
दरम्यान, रविवारी पोलिसांनी पर्यटकांकडून तब्बल 75 हजार रुपये दंड वसूल केला आहे.

या दरम्यान, कोरोना च्या पार्श्वभुमीवर अद्यापही काही ठिकाणी नियम लागू असल्याने वेल्हे पोलिसांनी तोरणा, राजगड आणि मढेघाट धबधबा या ठिकाणी जाण्यासाठी बंदी घातली आहे.
त्याचप्रमाणे पर्यटकांची चौकशी करण्यासाठी करंजवणे याठिकाणी तपासणी नाके देखील तयार करण्यात आला आहे.

Web Title : pune rural police | police take action against on tourists traveling in lonavla mulshi sinhagad area

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

BJP ला 750 कोटी देणगी देणारे ‘ते’ कोण ? उद्योगपतींच्या चाव्या भाजपच्या व्यापारी मंडळाकडे ? जाणून घ्या सविस्तर