Pune Rural Police | पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांच्या मुलीने एव्हरेस्टचा बेस कॅम्प 7 दिवसात केला सर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Rural Police | पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असणारे शिवाजी ननवरे आणि त्यांची मुलगी देवयानी ननवरे यांनी जगात सर्वात उंच असलेल्या एव्हरेस्ट शिखरावरील बेस कॅम्पची आव्हानात्मक चढाई केवळ 7 दिवसात पूर्ण केली. ननवरे यांच्या या कामगिरीमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलाचे (Pune Rural Police) नाव गिर्यारोहकांच्या यादीत झळकले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे ननवरे पिता-पुत्री वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

शिवाजी ननवरे हे गडचिरोली येथे कार्यरत असताना त्यांना गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली. त्यानंतर ते पुण्यात आल्यानंतर त्यांनी आपली आवड कायम ठेवली. एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक क्षमता अत्यावश्यक असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी बेस कॅम्पवर चढाई करताना येणाऱ्या अडचणी व आव्हानावर कशी मात करता येते, प्रतिकूल वातावरणात कोणत्या उपाय योजना कराव्या लागतात याची माहिती शिवाजी ननवरे यांनी दिली.

ननवरे यांनी सांगितले की, 22 अंश उणे सेल्सिअस तापमानात एव्हरेस्ट बेस कॅम्पची आव्हानात्मक चढाईची सुरुवात पायोनियर एडवेंचर कंपनीच्या मदतीने काठमांडू येथून केली. यानंतर लुकला या ठिकाणी पोहचल्यावर तेथून पायी चालण्यास सुरुवात केली. याठिकाणाहून एव्हरेस्ट बेस कॅम्प 65 किलोमीटर आहे. हा टप्पा पूर्ण करण्यासाठी आम्हाला सात दिवस लागले. तापमान उणे असल्याने ही चढाई प्रतिकूल हवामानाचा सामना करत आणि योग्य ती काळजी घेऊन करावी लागते. अति उत्साह जीवावर बेतण्याची शक्यता असते.

या ठिकाणच्या तापमानात स्वत:च्या संरक्षणासाठी उच्च ब्रँडेड दर्जाचे कपडे असणे आवश्यक आहे.
सकाळी सात वाजता ट्रेकिंग सुरु केल्यानंतर दुपारी दोन पर्यंत चढाई करु शकतो.
दोन नंतर हवामानात बदल होत असल्याने ट्रेकर्सना टी हाऊसचा आधार घ्यावा लागतो.
उंच ठिकाण असल्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे नॉर्मल चालताना दमछाक होते.
शारीरिक, मानसिक आणि आत्मविश्वास असणारे ट्रेकर्सच यामध्ये यशस्वी होतात, असेही ननवरे यांनी सांगितले.

एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करण्यासाठी रोज व्यायाम करणे आवश्यक आहे. यामध्ये सायकलिंग, स्विमिंग, पळणे,
जवळचे मोठे डोंगर चढणे यावर भर दिला पाहिजे. त्यामुळे आपल्यात आत्मविश्वास निर्माण होतो,
असे शिवाजी ननवरे यांनी सांगितले. त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल पुणे ग्रामीण पोलीस दलाचे
(Pune Rural Police) पोलीस अधीक्षक अंकित गोयल व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी शुभेच्छा दिल्या.

Web Title :-Pune Rural Police | pune rural police sub inspector of local crime branch visited everest base camp with his daughter

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hindi Language Politics | हिंदी भाषेचे राजकारण पुन्हा पेटले, तामिळनाडूमध्ये एकाचा आत्मदहनामुळे मृत्यू

Pune Crime | पुणे शहरात मेफेड्रोन व गांजा विक्री करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेकडून अटक, 4.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

Baba Ramdev Controversy | ठाण्यातील वक्तव्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची रामदेव बाबांना नोटीस