Pune Rural Police | पोलिसाची हाताची नस कापून घेतल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या, मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  पुणे ग्रामीण पोलिस (Pune Rural Police) दलात कर्तव्यासाठी तैनात असलेल्या एका पोलिस कर्मचार्‍यांने आत्महत्या (Policeman Suicide) केली आहे. राजगड पोलिस ठाण्यात (Rajgad Police Station) कार्यरत असलेल्या तरूण पोलिसानं (Young Police) आत्महत्या (Suicide) केल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, मृतदेहाच्या जवळ सुसाईड नोट (Suicide Note) सापडली असून त्यामध्ये सॉरी मॉम (Sorry Mom) असं लिहीलं आहे. Pune Rural Policeman Suicide by cutting veins of hand, suicide note found

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

रज्जाक मोहम्मद मणेरी असं आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचार्‍याचं नाव आहे. रज्जाक हे मुळचे इंदापूर तालुक्यातील मणेरी येथील रहिवाशी होते.
पुणे ग्रामीण पोलिस दलातील राजगड पोलिस ठाण्यात गेल्या काही वर्षापासून ते कार्यरत होते. गेल्या 2 दिवसांपासून मणेरी यांचे नातेवाईक त्यांच्याशी संपर्क करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, ते कॉल उचलत नसल्याने त्यांनी मणेरी यांचे रहावयाचे ठिकाण गाठले. किकवी येथील मणेरी यांच्या खोलीजवळ पोहचल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना मणेरी यांनी गळफास घेतल्याचे दिसले. दरम्यान, नातेवाईकांनी घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करताना पोलिसांना मणेरी यांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट मिळाली. त्यामध्ये त्यांनी सॉरी मॉम असं लिहीलं होतं. मणेरी यांनी गळफास घेण्यापुर्वी हाताची नस कापूर घेतली होती. दरम्यान, मणेरी यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Web Title : Pune Rural Police | Pune Rural Policeman Suicide by cutting veins of hand, suicide note found

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | पुण्यातील 4 धरणाच्या पाणीसाठयात तब्बल दीड टीएमसीची वाढ