Pune Rural Police | मोठी कारवाई ! पुणे विद्यापीठाची बनावट प्रमाणपत्रं बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Rural Police | पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) एक मोठी कारवाई केली आहे. पुणे विद्यापीठासह (Pune University) इतर महाविद्यालयांची बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ही छापेमारी स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) केली आहे. नीरा (Nira) येथे धाड टाकून 3 जणांना अटक (Arrested) करण्यात आली आहे. या तिंघावर जेजुरी पोलिस ठाण्यात (Jejuri Police Station) एफआय आर (FIR) दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी, गणेश संपत जावळे (Ganesh Sampat Jawale), मनोज धुमाळ (Manoj Dhumal) (दोघे रा. नीरा) आणि वैभव लोणकर (Vaibhav Lonakar) (रा. बारामती) या तिघांना याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इतर महाविद्यालयांची बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका तयार करुन त्यांची विक्री केली जात असल्याची माहिती एलसीबीचे एपीआय संदीप येळे (API Sandeep Yelle) यांना मिळाली होती. या माहितीनूसार पथकानी चौकशी करुन नीरा येथील समीक्षा प्रिंटिंग प्रेसमध्ये छापा टाकला. त्यात मोठ्या प्रमाणात बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका बनवण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. तेथील तिंघाना पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे.

दरम्यान, आता ही टोळी बनावट प्रमाणपत्र बनवण्याचे काम ते किती दिवसांपासून करत होती.
आजतागायत किती लोकांना असे बनावट प्रमाणपत्र दिलेत.
त्याचबरोबर किती जणांनी बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरीसाठी, पुढील शिक्षणासाठी आणि बढतीसाठी,
वेतनवाढीसाठी उपयोग केला आहे, याची देखील चौकशी करण्यात येणार आहे.
दरम्यान, या बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळींनी किती जणांना प्रमाणपत्र असंच दिलं आहे.
याचा तपास मार्गी लावुन त्यांच्यावर काय कारवाई (Action) होणार हे बघणे आवश्यक आहे.

Web Title :- Pune Rural Police | pune university gang making fake certificates exposed by jejuri police station of pune rural police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Rural Police | व्यावसायिक व उद्योजकांकडे खंडणी मागणाऱ्यांच्या मुसक्या आवळणार – SP डॉ. अभिनव देशमुख

Pankaja Munde | करुणा शर्मा प्रकरण : पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; म्हणाल्या…

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांना ‘या’ आठवड्यात मिळेल डबल ‘बोनस’, जाणून घ्या किती वाढून येणार वेतन