ग्रामीणच्या पोलिसांचा भूगावच्या हॉटेल ‘सरोवर’ वर छापा

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन – हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हॉटेल सरोवरवर रात्रीच्या वेळी छापा टाकून ५९ हजार ४२० रुपये किमतीची विदेशी दारु, बिअर, वाईन जप्त केली आहे.

याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. मद्यविक्री करत असलेले संदीप संपत घोगरे (वय ३०) व राजेश विठ्ठल मुकडे (वय २१, दोघे रा. सरोवर हॉटेल, भूगाव, ता. मुळशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पौड रोडवरील अनेक हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे राजरोज दारु, हुक्का मिळत असल्याची तक्रार पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे करण्यात आली होती.

पौड रोडवरील ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर गैरकृत्ये सुरु असल्याचे पाटील यांनी सांगण्यात आले होते. या भागातील अनेक हॉटेलांकडे मद्यविक्रीचा परवाना नसताना तेथे बेकायदेशीरपणे सर्रास दारु विक्री केली जात आहे. या तक्रारीनंतर ही पहिली कारवाई करण्यात आली आहे.

हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे-पाटील त्यांना २२ जून रोजी पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भूगाव येथे विदेशी दारू, बिअर व वाईन बेकायदेशीरपणे विनापरवाना खुलेआम अवैधपणे विकली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार विकास लगस, नितीन कदम, आर. व्ही. भगत व पी. आर. शिंदे हे रात्री साडेदहा वाजता हॉटेल सरोवर येथे गेले.

पथक तेथे पोहोचले त्यावेळी हॉटेलच्या काऊंटरवर उभे असलेले दोन जण तिथे ग्राहकांना मद्य विकत असताना दिसले. पथकाने आत जाऊन अचानक तपासणी केली असता, त्यांना ब्लॅकडॉग व्हिस्की, ग्रीनफिल्ड व्हिस्की, ओल्ड मंक व्हिस्की, सुला सिको वाईन, चंदन फ्रूट वाइन, कासबर्ग स्ट्राँग बिअर, किंगफिशर स्ट्राँग बिअर, टुबर्ग बिअर, बडवायझर मॅग्झम बिअर अशा ५९ हजार ४२० रुपयांचा मद्यसाठा आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला असून दोघांना अटक केली आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

गवारीचे ‘हे’ फायदे तुम्ही वाचले तर होईल ‘आवडती भाजी’

‘हे’ उपाय केले तर चष्मा लागणार नाही, नंबर वाढणार नाही

सावधान ! पाय दुखणे हा असू शकतो हार्ट अ‍ॅटॅकचा संकेत

कॅफिनचे अतिसेवन करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक