वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मटक्यांच्या अड्ड्यांवर छापे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे ग्रामीण पोलीसांच्या वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोमेश्वर शहरात सुरू असणार्‍या मटक्यांच्या अड्ड्यांवर बारामती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकाचवेळी छापेमारी केली. यात 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र अरुण भांडवलकर (रा. सोमेश्वर ता. बारामती), मंगेश प्रकाश जगताप (रा. मूर्ती, ता. बारामती), भगवान रामलिंग सोनवणे (रा. सोमेश्वर), विशाल सर्जेराव गायकवाड (रा. सोमेश्वर), बाळासाहेब सदाशिव पवार (रा. सोमेश्वर), सौरभ विश्वास मोरे (रा. मूर्ती, तालुका बारामती) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

बारामती तालुक्यातील सोमेश्वर शहरात अवैध मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानुसार, बारामती गुन्हे शाखेचे चंद्रशेखर यादव व त्यांच्या पथकाने एकाच वेळी अचानक 3 ठिकाणी मटक्याच्या अड्ड्यावर तसेच एका ऑनलाइन मटक्यावर छापा टाकला.

त्यावेळी आरोपी हे कल्याण मटका नावाचा मटका व ऑनलाइन मटका जुगार चालवत असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी यावेळी तीन ठिकाणावरून 35 हजार 130 रुपये रोख आणि 21 हजार रुपयांचे मटक्याचे जुगार साहित्य असा 56 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.