दौंड : कुरकुंभ, भांडगाव येथील मटका, जुगार अड्ड्यांवर धाड ! 3 लाखांच्या मुद्देमालासह 15 जण अटकेत

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील यवत आणि दौंड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैधरीत्या सुरू असलेल्या ऑनलाइन मटका, जुगार अड्ड्यांवर ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील आणि बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली दौंडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा आणि बारामती क्राईम ब्रँच पथकाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पथकाने आज धाड टाकून सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करत 15 जणांना अटक केली आहे. ही कारवाई दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील कुरकुंभ आणि यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भांडगाव येथे करण्यात आली.

याबाबत खबऱ्या मार्फत या पथकाला ही माहिती मिळाली होती यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना मार्गदर्शन करत सदर ठिकाणी रेड करण्यास सांगितले होते. त्यावरून कुरकुंभ आणि भांडगाव या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा आणि बारामती क्राईम ब्रँच पथकाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पो. हवा. संदिप जाधव, सुरेंद्र वाघ, पो. ना. स्वप्नील अहिवळे, पो.कॉ. दशरथ कोळेकर, पो.कॉ. विशाल जावळे, पो.कॉ. शर्मा, पो.कॉ.कडाळ, चा.पो.कॉ. पवार, राकेश फाळके, मांजरे तसेच यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे, पो.कॉ. संभाजी कदम यांनी छापा मारून खालील वर्णनाचा माल हस्तगत केला.
1) 1,09,410 = रोख रक्कम
2) 48000 = चार कॉम्पुटर
3) 30000 = दोन लॅपटॉप
4) 30000 = दोन इन्व्होटर
5) 58500 = 9 मोबाईल फोन
6) 21900 = इतर
असा सुमारे 2,97,810 /- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच 15 आरोपीना अटक करण्यात आली.