Pune : सासवड येथील जुगार क्लबवर ग्रामीण पोलिसांचा छापा ! 30 जण ताब्यात 33 लाखांचा मुद्देमाल जप्त, जाणून घ्या सर्वांची नावे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दिवे घाट माथा सासवड येथील विजय कोल्हापुरे यांच्या मालकीच्या VK हॉटेल विक्टोरिया इन इव्हिनिंग येथे चालत असलेल्या जुगार क्लबवर शनिवारी (दि.3) पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली.

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या सूचनांनुसार दहशतवाद विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह सासवड परिसरामध्ये गोपनीय माहिती कामाकरिता पेट्रोलिंग करीत असताना बातमीदारद्वारे माहिती मिळाली की सासवड येथील हॉटेल विक्टोरिया इन इव्हिनिंग( VK ) येथे जुगार खेळला जात आहे तसेच तेथे कसीनो असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांनी पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांना कळविल्यानंतर त्यांनी सदर ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिल्याने ही माहिती सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी एस हाके यांना कळवून मदतीसाठी सासवड पोलिस स्टेशन स्टाफ घेवून या पथकाने जुगार क्लबवर कारवाई केली.

या कारवाईमध्ये जुगार खेळताना व जुगार चालवताना हॉटेल मालकासह एकूण 30 जणांना ताब्यात घेण्यात आले. पांडुरंग काळुराम हरगुडे (वय ३७ रा.बी १५ आरोह विरोह,भेकराई नगर पुणे), अशोक मारूती आबेकर (वय ४० रा. वडकी नाला ता.हवेली जि. पुणे), देवीदास दशरथ आबेकर (वय ४२ रा. वडकी नाला ता हवेली जि. पुणे), अनिल प्रकाश काळे (वय ३८ रा.सोनोरी ता.पुरंधर जि. पुणे), सतिश किसण काळे (वय ३३ रा. सोनोरी ता. पुरंधर जि. पुणे), संदेश राजेंद्र कुलकर्णी (रा. नाशिक सिडको), निरोंता नरजीनारी (रा.वेस्ट बंगाल), अशोक भाउ वाघमारे (वय ४७ रा.सर्वे न.१८ माउली कॉम्प्लेक्स फलॅट न.डी.६ कात्रज पुणे), निलेश दामोदर चौधरी (वय ३३ रा.पेठ नायगाव ता.हवेली जि.पुणे), अमोल विश्वनाथ पासले (वय ३२ रा. सर्वे ७ साई कृपा बिल्डींग फलॅट न. ६ धनकवडी पुणे), राहुल श्रीपती शिंदे (वय ३१ रा. ४२५/२६ गुलटेकडी पुणे-३७), संतोष चंदु परदेशी (वय ४७ रा.मुंढवा पुणे), भावेश बच्चुभाई चौव्हाण (वय ५१, रा.इदीरानगर विभाग २ रूम न.२२९ ता.दसकोई जि.अहमदाबाद गुजरात), दादासो तायप्पा महानवर (वय ४० रा.सोनगाव ता.फलटण जि.सातारा) नागनाथ वेताळ वाघमारे (वय ६६ रा.जुनाबाजार मंगळवारपेठ पुणे), बालाजी श्रीपती देवकाते (वय ४४ रा सोळवणे ता.देगलुर जि.नांदेड सध्या रा. झेंडेवाडी ता.पुरदर), श्रीनिवास हनुमंता जन्नु (वय ५२ रा.इंदीरानगर बिबेवाडी पुणे), किशोर मधुकर अवचट (वय ५६ रा औधगाव पुणे), निखील निलेश मोरे (वय २४ रा.सुर्योदय वाडी चिपळुन रत्नागीरी), वैभव सुर्यकांत परब (वय २९ रा.फलॅट न. ५०८६ आरम सोसा.पहीला मजला डी.विंग टागोर नगर गट न. ७ विक्रोळी, मुंबई ८३ सध्या रा.झेंडेवाडी), कुबेर श्रीप्रताप सिंग (वय २३ रा.ताना ता.ताडीखेत जि.आलमोड राज्य झारखंड सध्या रा.झेंडेवाडी ), शार्दुल नरसिंह जोशी (वय २३ संतोष नगर हनुमान कॉलणी कात्रज पुणे), मनसुख लाखाभाई परमार (वय ५६ रा.फातीमा नगर पुणे), किशन राम राठोड (वय ३५ रा.वरमा लोहगाव रोड), दिपक कनैयालाल शहा (वय ५६ रा.अहमदाबाद शिवम सोसा. याचे जवळ), प्रविण दत्तात्रय बो-हाडे (वय ३१ रा.तांदुळवाडी सोनोरी उस्मानाबाद), उबिनो सत्यन हजारे (वय २५ रा.वेस्ट बंगाल), विशाल गणेश जाधव (वय ३० रा.विक्रोळी मुंबई), प्रदिप पंढरीनाथ गवळी (वय ३० रा. इंदापुर जि.पुणे) यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम व इतर मुद्देमाल असा ३३ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी (सासवड) अण्णासाहेब जाधव , पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट (स्थानिक गुन्हे शाखा), सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी एस हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्ष चे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक फौजदार जितेंद्र शेवाळे, सुनील ढगारे, विश्वास खरात, पोलीस हवालदार राजेंद्र मिरगे ईश्वर जाधव, पोलीस नाईक विशाल भोरडे ,किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, लक्ष्मण राऊत, मोसिन शेख, अरुण पवार, पुणे ग्रामीण च्या दहशतवाद विरोधी कक्ष व सासवड पोलीस स्टेशनचे राजेश पोळ, भरत आरडे, अजित माने, ज्योतिबा भोसले, महेश उगले, राहुल कोल्हे, प्रकाश यादव यांच्या पथकाने केली आहे.