ग्रामीण पोलिसांच्या LCB आणि जेजुरी पोलिसांकडून 6 किलो गांजा जप्त

जेजुरी (संदीप झगडे) : पोलीसनामा ऑनलाइन – जेजुरी पोलीस स्टेशन कडुन मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मा.श्री.पद्माकर घनवट सो. यांना मिळालेल्या बातमी प्रमाणे सासवड यवत रोडने एक मोटारसायकल व स्विफ्ट गाडी मध्ये अज्ञात इसम गांजाची वाहतुक करीत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी सदरची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अंकुश माने यांना दिली.

मिळालेल्या महितीबाबत तात्काळ मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशानुसार जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत मौजे माळशिरस गावातील सूर्या लॉन्स मंगल कार्यालयाजवळ रोडवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे पथक व जेजुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांचे स्टाफ सह काल मंगळवार दि.११/०२/२०२० रोजी रात्री नाकाबंदी लावली होती.

साधारणपणे २२ : ४० वाजता वाघापूर बाजूकडून माळशिरस बाजूकडे जाणारी संशयीत हिरो एच एफ डिलक्स मोटारसायकल गाडी नं.एम. एच.१२, आर.जी.६०८४ व स्विफ्ट गाडी नं. एम. एच.०१, ए. ई.६४६० थांबवून चेक केले असता त्यामध्ये १) सचिन नरसिंग शिंदे, वय३२, रा.रिहे, ता.मुळशी, जि. पुणे, २) संगीता विष्णू जाधव, वय ४५, रा. सूर्या लॉन्स समोर, माळशिरस, ता.पुरंदर, जि. पुणे, ३) विष्णू किसन जाधव, रा.माळशिरस ता.पुरंदर, जि. पुणे, ४) राजेश चव्हाण रा.खोपोली, जि. रायगड हे इसम व त्यांचे ताब्यात बेकायदेशीर पणे ६ किलो गांजा मिळून आल्याने सदर वाहने व यातील दोन आरोपींना ताब्यात घेतले असून ३ व ४ अंधाराचा फायदा घेउन पळून गेलेले आहेत.

यातील आरोपी विरोधात जेजुरी पोलीस स्टेशनला गुरनं ४९/२०२०, गुंगीकरक औषधी द्रव्य आणी मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८६ चे कलम २० (ब) (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास पोसई श्री.नंदकुमार सोनवलकर हे करीत आहेत. सदरची कारवाही मा. संदीप पाटील (भापोसे) पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण, मा. जयंत मीना सो. (भापोसे) अप्पर पोलीस अधीक्षक सो. बारामती विभाग यांचा सूचनेनुसार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सो. अण्णासाहेब जाधव सो. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.