Pune Rural Police | अट्टल गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध, एमपीडीए कायद्यान्वये कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वाळूचोर, झोपडपट्टी दादा, धोकादायक व्यक्ती प्रतिबंधात्म (MPDA) कायद्यान्वये पुणे ग्रामीण (Pune Rural Police) मधील एका सराईत गुन्हेगाराला स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख (Superintendent of Police Dr. Abhinav Deshmukh) यांच्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी (Collector) यांनी मंजूरी दिली आहे. पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) दलातील हवेली पोलीस ठाण्याच्या (Haveli Police Station) हद्दीतील सोन्या उर्फ तुषार कोळाप्पा धोत्रे (वय-20 रा. जेपी. नगर, नांदेड, ता. हवेली) याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

आरोपी सोन्या उर्फ तुषार कोळाप्पा धोत्रे याच्या गुन्हेगारी कृत्यांना पायबंद घालण्यासाठी हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेलार (Police Inspector Shelar) यांनी आरोपी विरोधात एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे सादर केला होता. हवेली पोलीस स्टेशनमार्फत पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला पुणे जिल्हाधिकारी यांनी मंजूरी दिली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाद्वारे आरोपी धोत्रे याला 1 वर्षासाठी स्थानबद्धतेचा आदेश पारीत करण्यात आला आहे. त्यानुसार आरोपीला हवेली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेलार आणि त्यांच्या स्टाफने अटक केली आहे.

भविष्यात समाजास धोकादायक ठरणाऱ्या व्यक्ती, गुन्हेगारी टोळ्या आढळून
आल्यास त्यांच्यावर पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून कडक कारवाई (Strict action) करण्यात येणार आहे.
सामान्य नागरिकांना गुन्हेगारी टोळ्यांपासून त्रास असल्यास त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करावी.
असे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

Web Title :- Pune rural police take strong action against criminal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 259 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Ganeshotsav | यंदाही गणेशोत्सव मंदिरामध्ये होणार साजरा

PWC INDIA | ‘पीडब्ल्यूसी इंडिया’ची पुढील 5 वर्षात 1,600 कोटी रुपयांची गुंतवणूक, 10,000 आणखी नोकर्‍या निर्माण करणार; जाणून घ्या