Pune Rural Police | ट्रान्सफॉर्मर चोरणारी टोळी गजाआड, 48 गुन्हे उघडकीस; ग्रामीण पोलिसांकडून 14 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त (Video)

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिरूर व दौंड उप विभागातील विद्युत ट्रान्सफॉर्मर चोरणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी 48 ठिकाणी ट्रान्सफॉर्मरची चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून 14 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विशाल खंडू पवार (वय-25 धंदा जेसीबी चालक रा. तांबेवाडी, वडगाव सावताळ ता. पारनेर जि. नगर), प्रदीप राजेंद्र शिंदे (वय-26 धंदा चालक रा. साकूर गाडेकर ता. संगमनेर), ओमकार अजित घोडेकर (वय-19 धंदा चालक रा. साकुर घोडाकर मळा ता. संगमनेर),आदेश सयाजी भुजबळ (वय-19 रा. साकुर हळदावस्ती ता. संगमनेर), हर्षल राजेंद्र शिंदे (वय-24 रा. साकूर गाडेकरमळा ता. संगमनेर), श्रीकांत शिवाजी जाधव (वय-22 रा. वांगदरी ता. श्रीगोंदा), करण नाना माळी (वय-19 रा. दहिवडी मांजरेवस्ती ता. शिरुर मुळ रा. वांगदरी ता. श्रीगोंदा), सोनू विकास धुळे (वय-18 रा आंबळे ता. शिरुर मुळ रा. वाडेबोल्हाई थेऊर ता. हवेली, पुणे), चोरीचा माल खरेदी करणारा भंगार व्यावसायिक दिपक पांडुरंग सांगळे (वय-27 रा. बोलेगाव फाटा नागापूर ता. जि. नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पुणे ग्रामीण परिसरातील शिरुर, दौंड उपविभागात मागील महिन्यात ट्रान्सफॉर्मर चोरीचे प्रमाण वाढल्याने शेतकरी त्रस्त झाले होते. तसेच शेतीपिकाचे नुकसान होत होते. याशिवाय अंधाराचा फायदा घेऊन लुटमारी व चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके तयार करण्यात आली होती. ग्रामीण भाग आणि दुर्गम भागात चोरी झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शी किंवा सीसीटीव्ही मिळत नसल्याने पोलिसांना तपासात अडचणी येत होत्या. पोलिसांनी गुन्हा घडलेल्या ठिकाणी, गुन्ह्याची वेळ, गुन्ह्यांची कार्यपद्धतीचा बारकाईने तपास केला. तसेच घटनास्थळाकडे जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवली.

गुन्हेगार पोलीस रेकॉर्डवरील असल्याने पोलिसांकडून त्यांची माहिती घेण्यात येत होती. त्याचवेळी पथकाला आरोपी तळेगाव ढमढेरे परिसरात असल्याची माहिती मिळाली. तपास पथकांनी सापळा रचून आठ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरलेला मुद्देमाल दिपक सांगळे याला विकल्याचे सांगितले. पथकाने सांगळे याला अटक केली. या कारवाईत पिकअप वाहन, सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यापैकी एक चोरीची आहे. तसेच 500 किलो तांब्याच्या पट्ट्या व तारा असा एकूण 14 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

उघडकीस आलेले गुन्हे

शिरुर पोलीस स्टेशन – 18, शिक्रापूर पोलीस स्टेशन – 7, रांजणगाव पोलीस स्टेशन -4, यवत पोलीस स्टेशन – 11, खेड, दौंड व जेजुरी पोलीस स्टेशन मधील प्रत्येकी एक असे एकूण 48 गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी विशाल पवार याच्यावर 11 दुचाकी चोरीचे तर प्रदीप शिंदे यांच्यावर 3 गुन्हे दाखल आहेत. दिपक शिंदे ओतूर पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात फरार आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, एस.डी.पी.ओ प्रशांत ढोले, एस.डी.पी.ओ स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, एलसीबी सहायक पोलीस निरीक्षक राहूल गावडे, योगेश लंगुटे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, एकनाथ पाटील, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, दिपक साबळे, जनार्दन शेळके, राजु मोमीण, अतुल डेरे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, संजू जाधव, योगेश नागरगोजे, स्वप्निल अहीवळे, विजय कांचन, संदीप वारे, अमोल शेडगे, धिरज जाधव, सागर धुमाळ, अक्षय नवले, निलेस सुपेकर, अक्षय सुपे, हनुमंत पासलकर, दत्ता तांबे, रामदास बाबर, राहूल पवार, विनोद पवार, समाधान नाईकनवरे, तुषार भोईटे, मंगेश भगत, महिला पोलीस सुजाता कदम, शिरूर पोलीस स्टेशन नितीन सुद्रीक, परशुराम सांगळे, नाथा जगताप, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, किशोर तेलंग, प्रशांत गायकवाड, प्रतिक जगताप यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Talegaon Dabhade Pimpri Crime News | पिंपरी : तळेगाव दाभाडे परिसरातून चार पिस्टल व सहा काडतुसे जप्त, तिघांना अटक

Dheeraj Ghate On Pubs In Pune | पुण्यातून पब संस्कृती हद्दपार करा, नाहीतर रस्त्यावर उतरु – धीरज घाटे (Video)

Pune Crime News | पुणे : मोबाईल चोरीचे कनेक्शन थेट चीनपर्यंत, स्वारगेट पोलिसांची कारवाई

Yerawada Pune Crime News | पुणे : बहिणीला पळून नेल्याच्या कारणावरुन तरुणीच्या भावाकडून ज्येष्ठ नागरिकाचा धारदार शस्त्राने वार करुन खून, येरवडा परिसरातील घटना