Pune : औद्योगिकीकरण झाल्याने स्थलांतरित नागरिकांचे प्रमाण जास्त, त्यामुळे गुन्हेगारीत ही वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   औद्योगिकीकरण असलेल्या या जिल्ह्यात स्थलांतरित नागरिकांचे प्रमाण जास्त असल्याने येथील गुन्हेगारीही वाढ होत आहे. येत्या काळात संघटित गुन्हेगारी नियंत्रित करणे हे पाहिले प्राधान्य असेल, असे नवनियुक्त पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले आहे.

डॉ अभिनव देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. देशमुख म्हणाले, संघटित गुन्हेगारी मोडून काढली जाईल. हे पहिले प्राधान्य असले तरी महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात आरोपीला लवकरात लवकर अटक करणे. तपास करून दोषारोपपत्र न्यायलयात पाठविणे आणि दाखल गुन्ह्यामध्ये शिक्षेचे प्रमाण वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. तसेच जिल्ह्यात वाढत्या शहरीकरणामुळे वाहतुकीचे प्रश्न वाढत आहेत. वाहतुकीचे व्यवस्थापन करणे व नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळायला लावणे हा देखील महत्वाचा अजेंडा असणार आहे. तर जसे-जसे स्थानिक प्रश्न समोर येतील त्यावर लक्ष केंद्रित करून ते सोडविण्यावर भर दिला जाईल.

चौकट

कोरोना नियंत्रणाला पाहिले प्राधान्य

कोविड प्रादुर्भाव रोखण्याला पाहिले प्राधान्य आहे. कोरोना नियंत्रण संदर्भात पहिल्यापासून पोलिसानी सक्रिय सहभाग घेत काम केले आहे. राज्यसरकरच्या निर्देशानुसार ते काम सुरू राहील. सध्या मास्क न वापरणाऱ्याविरोधात गुन्हे दाखल करणे,जनता कर्फ्यु, गर्दीचे ठिकाणी नागरिकांना सोशल डिस्टनसिंग पाळायला लावणे आदीवर भर देणार आहोत.