Pune Sadashiv Peth Crime | एकमेकांकडे पाहून हसण्यावरून दोघांवर चाकूने वार, एम.आय.पी.टी कॉलेजमधील घटना

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – Pune Sadashiv Peth Crime | एकमेकांकडे पाहून हसण्याच्या कारणावरुन अल्पवयीन मुलाने व त्याच्या साथीदाराने दोघांवर चाकूने वार केले तर एकाला हाताने मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार शुक्रवारी (दि.22) दुपारी पावणे दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान सदाशिव पेठेतील एम.आय.पी.टी कॉलेजमध्ये (MIPT College Pune) घडला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambaug Police Station) एका अल्पवयीन मुलासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.(Pune Sadashiv Peth Crime)

याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन एका 16 वर्षाच्या मुलासह तनिष बोरडे (वय-18) याच्यावर आयपीसी 324, 323, 34 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा व त्याचा मित्र कॉलेजच्या मधल्या सुट्टीत जेवण करण्यासाठी जात होते. त्यावेळी अल्पवयीन मुलगा आणि त्याचा साथीदार तनिष बोरडे हे दुचाकीवरुन त्यांच्याजवळ आले. शाळेत एकमेकांकडे पाहून हसण्याच्या कारणावरुन अल्पवयीन मुलाने त्याच्या कमरेत लपवलेला चाकू काढून फिर्यादी यांच्या मुलाच्या हातावर, मानेवर व पोटावर वार केले.

त्यावेळी तनीष बोरडे याने फिर्यादी यांच्या मुलाला व त्याच्या मित्राला हाताने मारहाण केली.
हा वाद सुरु असताना फिर्यादी यांच्या मुलाचा मित्र वाचवण्यासाठी पुढे आला.
याचा राग आल्याने अल्पवयीन मुलाने त्याच्या पाठीवर मानेखाली चाकूने वार करुन जखमी केले.
त्यानंतर आरोपी तेथून पळून गेले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Baramati Lok Sabha Election 2024 | विजय शिवतारे यांचा बोलविता धनी कोण? अजित पवार समर्थक सावध

Pune Vidyapeeth Crime | राजकीय पोस्ट डिलीट केल्याच्या कारणावरुन मारहाण, पुणे विद्यापीठातील घटना