Pune Sahakar Nagar Police | मोक्का व दरोडयाच्या गुन्हयात 10 महिन्यांपासुन फरार असलेल्या सराईत गुंडाला सहकारनगर पोलिसांकडून अटक (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Sahakar Nagar Police | मोक्का आणि दरोडयाच्या गुन्हयात गेल्या 10 महिन्यांपासुन फरार असलेल्या आरोपीला सहकारनगर पोलिसांनी अरण्येश्वर मंदिराजवळून अटक केली आहे. (Pune: Sahakar Nagar Police Arrest Bipin Alias Lakhan Pandit Khandagle Who Abscond In MCOCA Frm Last 10 Months)

बिपीन उर्फ लखन पंडित खंडागळे (33, रा. सर्व्हे नं. 12, अशोक नगर, लक्ष्मीनगर, पोलिस चौकीजवळ, येरवडा, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 26 जून 2023 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास प्रविण विभीषण जाधव व त्यांचे मित्र हे अण्णा भाऊ साठे वसाहत येथे थांबले होते. त्यावेळी तेथे सिध्दार्थ गायकवाड, राजु उमाप व त्याचा मुलगा राम उमाप हे त्यांच्या इतर साथीदारांसह प्रविण जाधव यांच्याजवळ आले.

त्यांच्या हातात लोखंडी धारधार हत्यारे होती. सिध्दार्थ गायकवाडने दत्ता जाधव यांना तु प्रविणला साथ देतो आहे. तुम्हाला दोघांना व तुमच्या गँगला आम्ही बघुन घेतो. तुम्ही सुधरा नाहीतर एकएकाचा मर्डर करीन अशी धमकी देण्यात आली होती. ऋषिकेश मोरे यास शिवीगाळ करून सिध्या भाईच्या नादी लागलाय तु, तुला भाई काय चिज आहे हे दाखवतो असे म्हणुन सिध्दार्थ गायकवाडने फिर्यादी यांना त्याच्या हातातील लोखंडी हत्याराचा धाक दाखवुन फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशातून बळजबरीने एक हजार रूपये काढुन घेतले होते. याबाबत सहकानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

सदरील गुन्हयात सहकारनगर पोलिसांनी सिध्दार्थ गायकवाड, राम उमाप, सनी परदेशी, अमोल बनसोडे, समीर शेख आणि त्याच्या इतर साथीदारांना अशा एकुण 16 जणांना अटक केली होती. बिपीन उर्फ लखन पंडित खंडागळे हा गेल्या 10 महिन्यांपासुन फरार होता. दि. 6 मार्च 2024 रोजी पोलिस अंमलदार अमोल पवार यांना आरोपी हा अरण्येश्वर मंदिराजवळ मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने सापळा रचुन त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला दि. 12 मार्च पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील,
सहाय्यक आयुक्त नंदिनी वग्यानी, वरिष्ठ निरीक्षक सुरेंद्र मळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस उपनिरीक्षक सुरज गोरे, एएसआय बापु खुटवड, पोलिस अंमलदार अमोल पवार,
किरण कांबळे, बजरंग पवार, संजय गायकवाड, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, सागर कुंभार,
निलेश शिवतारे, विशाल वाघ, सागर सुतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP On Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचे मानसिक संतुलन ढासळलंय, तातडीने उपचाराची गरज, नितीन गडकरींच्या विधानावर भाजपाचे प्रत्युत्तर

Namo Chashak 2024 In Pune | कोथरुड मधील खेळाडुंच्या कौशल्य विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार! चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

Siddhesh Ramdas Kadam | रामदास कदमांची काल भाजपावर टीका, आज सरकारने मुलाला दिलं मोठं पद! पण नियम मोडल्याची चर्चा

Professor G N Saibaba | कारागृहात माझा अनन्वित छळ, ९० टक्के शरीर कार्यरत नसताना अतोनात त्रास दिला, प्रा. साईबाबांचा गंभीर आरोप

Sunil Tatkare-BJP | मतदारसंघातच सुनिल तटकरेंविरोधात भाजपा पदाधिकाऱ्याचे आवाहन, ”रायगड भ्रष्टाचाराच्या खाईत जाईल, मतदान करू नका”