Pune : वडगावशेरीतील नगररोड क्षेत्रीय कार्यालयाजवळ अर्धे शटर उघडे ठेवून दारूची विक्री; वाईन शॉपवर आरोग्य निरीक्षकांनी केली कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वडगावशेरीतील नगररोड क्षेत्रीय कार्यालयाजवळ अर्धे शटर उघडे ठेवून दारू केली जात होती. त्या दुकानावर महापालिकेच्या नगररोड क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य निरीक्षकांनी दुपारी 3.43 वाजता कारवाई केली. याप्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती नगररोड क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य निरीक्षिका सोनिया अभोणकर यांनी दिली. येरवडा पोलीस स्टेशनमध्ये एन.एम. वाईन्स शॉप या दुकानमालकासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

आरोग्य निरीक्षिका अभोणकर म्हणाले की, आज दुपारी नगररोड क्षेत्रीय कार्यालयाजवळ एल.एम. वाईन्स शॉप अर्धे शटर उघडे ठेवून दारू विक्री करत होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर नगररोड क्षेत्रीय कार्यालयांतील महापालिका सहायक आयुक्त सुहास जगताप यांच्या मार्गदर्शऩाकाली वरिष्ठ आरोग्य निरीक्षक अनिल डोळे, आरोग्य आरोग्य निरीक्षिक सोनिया अभोणकर, सुषमा मुंडे, समीर खुळे, संदेश रोडे, मुकुंद घम, सचिन गवळी यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. नियमांचा भंग करून तुम्ही दारू कशी विक्री करता अशी विचारणा केली, तुम्हाला दंड भरावा लागेल, असे सांगितले. त्यानंतर त्याने आमच्याशी हुज्जत घातली.

आमच्या मालकाशी बोला असे सांगितले. मात्र, प्रकरण अंगावर येणार असे दिसताच त्याने पळ काढला. दरम्यान, आम्ही त्याच्याकडील शॉप अॅक्ट लायन्स पाहिले, त्यावरील नाव पाहून त्यांच्या कानावर ही बाब घातली. मात्र, त्यांनी आम्हालाच ओळखपत्र दाखवा असे सांगत, फोनवर बोलत असताना आमचा फोटो काढून निघून गेला. पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी वॉइनशॉप मालकाला बोलावले. मात्र, त्याने येतो असे सांगितले, आठ वाजेपर्यंत तो आला नाही. त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असे सांगितले.

नगररोड क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य निरीक्षकांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये एल.एम. वाईन्सविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार येरवडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे यांनी गुन्हा दाखल केला आहे. एल.एम. वाइन्स दुकान सील करणार असल्याचे पोलिसांनी सांगितल्याचे आरोग्य निरीक्षिका सोनिया अभोणकर यांनी सांगितले.