Pune : चंदनाची तस्करी प्रकरणी 25 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, ग्रामीण पोलिसांची कारवाई

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर तालुक्याच्या शिक्रापुर मध्ये पुणे नगर महामार्गावर टेंपोमधुन छुप्या पद्धतीने होणारी चंदनाची तस्करी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकिस आणली असुन टेम्पोचा पाठलाग करुन तब्बल २५ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना चंदनतस्करी होत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला सुचना केल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी संशयित टेंपों (एम एच १७ बी डी २६९८) वर नगर च्या दिशेने जात असताना पाळत ठेवुन पाठलाग सुरु केला. शिक्रापुर येथील चाकण चौकात टेंपो थांबवुन चालकाकडे अधिक चौकशी केली माञ चालकाने टेंपो रिकामा असल्याचे सांगितले. परंतु पोलिसांनी टेंपोची संपुर्ण झडती घेतली असता, गाड़ीच्या हौद्या मधे एक छुपा कप्पा जो कि दिसणार नाही अश्या पद्धतीने तयार केला होता. सदर कप्पा उघडून पाहिला असता त्या मध्ये मोठ्या आकाराच्या गोन्यांमध्ये १९० किलोग्राम वजनाची चंदनाच्या गाभ्याची लाकडे मिळून आली. या प्रकरणी आरोपी सूरज कैलास उबाळे (वय. 24,रा. चांदा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर) यास ताब्यात घेण्यात आले.आरोपीची वैद्यकीय तपासणी पुढील कारवाईसाठी मुद्देमालासह शिक्रापुर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या सूचनेनुसार पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलिस उपनिरीक्षक अमोल गोरे, सहा. फौजदार दत्तात्रय गिरमकर, पोलिस नाईक मंगेश थिगळे, पोलिस शिपाई अक्षय नवले, प्रसन्नजीत घाडगे यांनी केली आहे.