Pune Sangvi Crime | रिलायन्स स्टोअरमधील चोरी पकडल्याने कर्मचार्‍यांनी आणून ठेवला दुसरा माल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Sangvi Crime | रिलायन्स स्टोअरमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी रिक्षामधून गपचुप माल चोरुन नेल्याचे उघड झाले. चोरीची कबुली दिल्यानंतर या कर्मचार्‍यांना रिलायन्स स्टॉकचा नसलेला माल परस्पर रिक्षातून आणून पार्किंगमध्ये ठेवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत पिंपळे गुरव येथील रिलायन्स स्मार्ट सुपर स्टोअर्सचे स्टोअर मॅनेजर सचिन सोनार (वय ४४,रा. पुनावळे ) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६४/२४) दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी शैलेश वाघमारे, दीपक शिंदे, मोहित पंडागळे, अजय पंडागळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिलायन्स स्मार्ट स्टोअर्सचे मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांच्या स्टोअरमध्ये रोज विक्री करीता आलेल्या मालाची नोंद इनवर्ड रजिस्टारमध्ये करुन घेणे तसेच विक्री झालेल्या मालाची नोंद आर पॉस या अ‍ॅप्लीकेशनमधून होते. डिसेंबर महिन्यामध्ये स्टोअरमधील माल कमी होत असल्याचे जाणवले. त्यामुळे स्टोअर्समधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता १४ डिसेबर रोजी स्टोअर्स मधील कर्मचारी शैलेश वाघमारे, दीपक शिंदे, मोहित पंडागळे, अजय गायकवाड या चौघांनी मिळून स्टोअर हाऊसची मागच्या बाजूला रिक्षातून स्टोअरमधील माल चोरी करुन घेऊन जाताना दिसून आले. त्यावेळी तेथील सिक्युरिटी लॉस प्रिव्हेन्शन असोशिएट अश्विन खाडे हे तेथे हजर नसल्याचे दिसून आले.

या चौघांनी स्टोअरमधील चहा पॅकेट, व्हॅसलिन बॉडी लोशन, मॅगी नुडल्स पाकिटे, निव्हीया लीप बाम अशा १९ हजार ६५४
रुपयांचा माल चोरुन नेला होता. याबाबत फिर्यादी यांनी शैलेश वाघमारे याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने चोरीची
कबुली दिली. त्यानंतर दोन दिवसांनी शैलेश वाघमारे याने चोरी केलेल्या मालाप्रमाणे माल जो रिलायन्स स्टॉकचा
नसलेला माल परस्पर रिक्षातून आणून पार्किंगमध्ये ठेवून दिलेला आहे. हा माल रिलायन्सचा नसल्याने त्यांनी तो
स्वीकारलेला नाही. पोलिसांनी चौघांवर नोकराने केलेल्या चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Executive Engineer Kiran Deshmukh Suspended | पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख निलंबित, जाणून घ्या कारण

Pune Navale Bridge Accident | पुणे: नवले पुलाखाली विचित्र अपघात; 8 ते 9 वाहने एकामेकांना धडकली (Video)

PM Narendra Modi In Yavatmal | पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारीला यवतमाळमध्ये, लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता

Sanjay Raut On BJP | राऊतांचा मोठा दावा, दोन्ही गटांना नड्डांनी सांगितले की, ”धनुष्यबाण, घड्याळाला लोक मतदान करणार नाहीत, त्यामुळे…”

Pune NCP News | प्रशांत जगताप यांच्यासह शरद पवार गटाच्या 9 जणांवर गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण (Videos)

बसची वाट पहात थांबलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, हडपसर येथील प्रकार