माजी सरपंचाची राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या

खेड : पोलीसनामा ऑनलाइन – तालुक्यातील भांबोलीच्या माजी सरपंचाने राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

प्रदीप ज्ञानेश्‍वर नवरे असे आत्महत्या केलेल्या सरपंचाचे नाव आहे. भांबोली हे गाव भामा खोर्‍यात आहे. प्रदीप नवरे यांनी राहत्या घरातील शेडमध्ये गळफास घेतला. त्यांनी कोणत्या कारणामुळे गळफास घेवुन याबाबत माहिती समोर आलेली नाही. नवरे यांच्या आत्महत्येमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. आत्महत्येची घटना उघडकीस आल्यानंतर गावामध्ये वेगवेगळया चर्चेला उधाण आले आहे.