Pune : 48 कोटी रूपयांच्या फसवणूक प्रकरणी सायली फडणीस-गडकरी हिला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बँकेपेक्षाही अधिक व्याज देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात फरार असणाऱ्या सायली विनायक फडणीस/गडकरी (वय 27) हिला न्यायालयाने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर देण्यासाठी न्यायालयाने उपस्थित रहावे असे म्हंटले आहे.

अलंकार पोलीस ठाण्यात 2017 मध्ये रत्नाकर माटे यांच्या फिर्यादीवरून फडणीस ग्रुप्स ऑफ कंपनीने केलेल्या गैरव्यवहार व फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल आहे. यात विजय प्रभाकर फडणीस (वय 51), अनुराधा विनय फडणीस (वय 50), शरयु विनायक ठकार (वय 50), भाग्यश्री गुरव (वय 50) यांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून ब्रोकर उदय पाटणकर यांच्या मार्फत व इतर ब्रोकर मार्फत या आरोपींनी नागरिकांना बँकेपेक्षा जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून त्यांना स्थापन केलेल्या वेगवेगळ्या कंपन्यात गुंतवणूक करण्यास भाग पाडले. पण, मूळ मुद्दल व इतर व्याज न देता त्यांची फसवणूक केली. तपासत आतापर्यंत 342 नागरिकांची एकूण 48 कोटी 82 लाख 60 हजार 129 रुपयांची फसवणूकीचा आकडा समोर आला आहे.

या गुन्ह्याचा तपासात सायली विनायक फडणीस (वय 27) ही वेगवेगळ्या कंपन्यांची डायरेक्टर असून, तिने या व्यक्तींना बोलून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या विश्वासावर नागरिकांनी पैसे गुंतवले. सायली मुख्य आरोपी विजय फडणीस याची मुलगी आहे. इतर आरोपीसोबत त्यांचे नातेसंबंध व घनिष्ठ संबंध आहेत.

त्यामुळे तिच्याकडून काही कागदपत्रे आणि मालमतेची माहिती मिळवणे आहे. तर इतर आरोपी अटक असून त्यातील काहीजणांना जामीन देखील मिळाला आहे. पण, सायली आणि ब्रोकर उदय पाटणकर हे फरार आहेत. तिचा शोध घेतला पण ती सापडत नाही. अनेक ठिकाणी तिचा शोध घेतला जात असताना तिने अटकपूर्ण जामिनासाठी प्रयत्न केले होते. न्यायालयाने मात्र तिचा जामीन अर्ज फेटाळला आहे. पाहिजे आरोपी सायली हिला न्यायालयाने आता जाहीरनामा काढत तिला 28 मे रोजी न्यायालयात हजर रहावे, आदेश दिले आहेत.