पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना 6 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहिर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहर आणि जिल्हयात पावसाचा जोर कायम राहिल्याने शहर आणि जिल्हयातील पुरपरिस्थिती कायम असल्याने उद्या (दि.6 ऑगस्ट) सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहिर केली आहे. जिल्हाधिकारी नवल किशार राम यांनी सोमवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.

पुण्यातील खडकवासला आणि पानशेत धरण 100 टक्के भरली आहे. खडकवासला धरणातून दोन दिवसांपासुन मोठया प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये म्हणून जिल्हाधिकारी नवल किशार राम यांनी उद्या (मंगळवारी) सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहिर केली आहे. उद्याच्या सुट्टीबाबत सर्व संबंधितांना कळविण्यात आले आहे. सोमवारी देखील पावसामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशार राम यांनी दिली आहे.


आरोग्यविषयक वृत्त