Pune School Bus Accident | पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मध्ये स्कूल बस दरीत कोसळली, 44 विद्यार्थी जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune School Bus Accident | गिरवली येथील आयुका दुर्बीण (Ayuka Telescope at Girvali) पाहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची स्कूल बस दरीत कोसळून भीषण अपघात (Pune School Bus Accident) झाला आहे. या अपघातात 44 विद्यार्थी जखमी (Student Injured) झाले आहेत. ही स्कूल बस आंबेगाव तालुक्यातील (Ambegaon Taluka) पिंपळगावच्या (Pimpalgaon) मुक्ताई प्रशालेची (Muktai School) होती. स्कूल बसमध्ये विद्यार्थ्यासह शिक्षक देखील होते. सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढून तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगावातील मुक्ताई प्रशालेचे विद्यार्थी गिरवली येथील आयुका दुर्बीण पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी प्रवासात शाळेची बस दरीत कोसळली (Bus Fell into Valley).
अपघात झाला त्यावेळी बसमध्ये 44 विद्यार्थी आणि 3 शिक्षक प्रवास करत होते.
अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकाने (Rescue Team) तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरु केले. आणि मुलांना बसमधून बाहेर काढले.

सर्व मुलांना तातडीने रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय घोडेगाव येथे दाखल करण्यात आले आहे.
तर चार मुलांना मंचर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
अद्याप मुलांच्या प्रकृतीबाबत माहिती समोर आलेली नाही. मात्र सर्व मुलांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येत आहेत.

Web Title :- Pune School Bus Accident | 44 students injured after a school bus fell into a valley in pune ambegaon

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | दहिहंडी उत्सवामध्ये गोळीबार करणाऱ्या चेतन ढेबे टोळीवर मोक्का, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 96 वी कारवाई

Sanjay Raut | दिलासा नाहीच! संजय राऊतांचा दसराही न्यायालयीन कोठडीतच, न्यायालयाने जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली