Pune School Bus Fares Increase | पुणेकरांना महागाईचा झटका ! स्कूल बसच्या भाड्यात प्रचंड वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune School Bus Fares Increase | कोरोनामुळे (Coronavirus) शाळा बंद (School Closed In Corona Period) असल्याने अनेक स्कूल बस बंद होत्या. मात्र, आता शाळा सुरु (Pune School Reopen) झाल्याने स्कूलबस पुन्हा सुरु झाल्या आहेत. परंतु पेट्रोल-डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ (Petrol-Diesel Price Hike) होत असल्याने मुलांना शाळेत ने-आण करणाऱ्या स्कूल बसच्या भाड्यात वाढ (Pune School Bus Fares Increase) करण्यात आली आहे. कोरोनाच्या पूर्वी जे भाडे होते त्यामध्ये तिप्पट वाढ स्कूल बस प्रोव्हायडर्सनी (Pune School Bus Providers) केली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या खिशावर चांगलाच ताण आला आहे. याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राने वृत्त दिले आहे.

स्कूल बसच्या वाढलेल्या भाड्याबाबत (Pune School Bus Fares Increase) बोलताना एका पालकाने सांगितले की, कोरोनाच्या काळापूर्वी म्हणजे दोन वर्षापूर्वी आम्ही घरापासून पाच किमी अंतरासाठी बसला 30 हजार रुपये वर्षाला देत होतो. यानंतर आता हे स्कूल बसवाले 70 ते 1 लाख रुपये वर्षाचं भाडं घेत आहेत.

विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस चालकाने सांगितेल की, इंधनाचे दर प्रचंड वाढले आहेत तसेच दोन वर्षापासून ही भाडेवाढ झाली आहे. मागील दोन वर्षात आम्हाला काहीच मिळकत झाली नाही. तसेच काही कारणांमुळे आता बसचे चालक व इतर व्यवसायात गेले आहेत. त्यामुळे चालकाची कमतरता आहे.

बोट क्लब (Boat Club) याठिकाणी राहणाऱ्या एका पालकाने सांगितले,
आमची मुलगी वडगाव शेरी (Wadgaon Sheri) येथील शाळेत शिकते.
तिची शाळा राहत्या घरापासून पाच किमी अंतरावर आहे. तिला शाळेत सोडण्यासाठी मी
स्कूल बसला वर्षासाठी 72 हजार रुपये भरले. यामध्ये चालकाच्या सुट्ट्या आणि उन्हाळी सुट्ट्यांचा महिना देखील वगळला नाही.
आम्हाला दोन मुलं असून त्यांचे भाडे देणे परवडत नाही. अनेक पालकांनी आपल्या मुलांना
त्यांच्या कारमधून शाळेत ने-आण करणं सुरु केली आहे.

 

Web Title :- Pune School Bus Fares Increase | Inflation hits Pune residents ! Huge increase in school bus fares


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | 8 वर्षाच्या मुलाचा निर्घृण खून, घराजवळ आढळला मृतदेह; परिसरात खळबळ

Dattatray Bharane On Harshvardhan Patil In Indapur | मंत्री दत्तात्रय भरणेंची जहरी टीका, म्हणाले – हर्षवर्धन पाटील हे लबाड आणि लफंगे, त्यांना जवळही येऊ देऊ नका

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी होणार