पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना 5 ऑगस्ट रोजी सुट्टी : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या किनारपट्टीवर ताशी 40 ते 60 कि.मी. ने वारे वाहत आहेत तसेच प्रादेशिक हवामान अंदाज केंद्राने रविवार, सोमवार आणि मंगळवारी (दि. 4 ते दि. 6 ऑगस्ट) अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुणे जिल्हयातील मावळ, भोर, वेल्हा आणि जुन्‍नर या तालुक्यांमध्ये शनिवारपासून अतिवष्टीस सुरवात झाली असल्याने पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी उद्या (दि.5 ऑगस्ट) पुणे जिल्हयातील सर्व शाळांना सुट्टी जाहिर केली आहे.

पुणे जिल्हयातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालये उद्या (दि. 5 ऑगस्ट) म्हणजेच सोमवारी बंद असणार आहेत. पुणे जिल्हयातील सर्वच शाळा आणि महाविद्यालये सोमवारी बंद असणार आहेत. त्याबाबतचा आदेश देखील जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काढला आहे. अतिवृष्टीचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांना होवु नये म्हणून जिल्हाधिकार्‍यांनी हे आदेश काढले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड मनपाचे आयुक्‍त, पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्‍त, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक, सर्व उपविभागीय अधिकारी, प्राथमिक आणि माध्यमिकचे शिक्षणाधिकारी, तालुका तहसिलदार आण जिल्हा माहिती कार्यालयास याबाबत कळविण्यात आले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like