Pune School Reopen | पुण्यातील 1 ली ते 7 वीचे वर्ग गुरुवारपासून सुरु होणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील पहिलीपासूनच्या शाळा 1 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, मुंबई, पुणे शहरातील स्थानिक प्रशासनानं याला विरोध दर्शवला होता. त्यानुसार पुण्यातील शाळा 15 डिसेंबरपर्यंत सुरु (Pune School Reopen) न करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने (Pune Corporation) घेतला होता. मात्र आता पुणे महापालिकेने पुण्यातील 1 ली ते 7 वीचे वर्ग गुरुवार दि. 16 डिसेंबर पासून सुरु (Pune School Reopen) करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी दिली.

 

शाळा सुरु (School Reopen) करण्यासंदर्भात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar), महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Municipal Corporation Commissioner Vikram Kumar), विभागीय आयुक्त सौरभ राव (Divisional Commissioner Saurabh Rao) यांच्या बैठक झाली. या बैठकीत पुण्यातील शाळा 16 डिसेंबरपासून सुरु (Pune School Reopen) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. (Pune School Reopen)

महापौरींनी सांगितले की, देण्यात आलेल्या काही गाईडलाईन्स, मार्गदर्शक सुचने प्रमाणे शाळा सुरु करण्यात येणार आहेत. शाळा सुरु करत असताना शाळांचे निर्जंतुकीकरण करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणं याबाबतच्या संबंधितांना सूचना दिल्या असून 16 डिसेंबर पासून पुण्यातील 1 ली ते 7 वीचे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत.

 

दरम्यान, राज्य सरकारने 1 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याची घोषणा केली होती.
मात्र, पालक संघटना आणि शिक्षण संस्था यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे माहपौरांनी सांगितले होते.
पुणे महापालिका आयुक्त आणि महापौर यांच्यात चर्चा झाल्यानंतर पहिली ते सातवीच्या शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
वर्ग सुरु करण्यासाठीची तयारी पूर्ण झालेली होती. मात्र, ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या (Omicron variant) पार्श्वभूमीवर महापालिकेने सावध पवित्रा घेतला होता.

 

Web Title :- Pune School Reopen | 1st to 7th class in Pune will start from Thursday, information of Mayor Murlidhar Mohol (Video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

डायबिटीजच्या रुग्णांनी दूधात ‘या’ 2 गोष्टी मिसळून प्याव्यात, Blood Sugar Level नियंत्रित करण्यासाठी पडतील उपयोगी

Maharashtra Vidhan Parishad Election 2021 | ‘वा..वा मिटकरी लैच बोलायला लागले’; चंद्रकांत पाटलांचा अमोल मिटकरींना टोला

 

Samantha Prabhu | अभिनेत्री समंथाच्या विरोधात गुन्हा दाखल, जावं लागेल जेलमध्ये? जाणून घ्या प्रकरण