Pune School Reopen | पुण्यातील शाळा आणखी काही दिवस बंद राहणार – अजित पवार (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑलनाइन – Pune School Reopen | राज्यातील कोरोना रूग्णांची (Corona in Pune) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, पुण्यातील पॉझिटिव्हीटी रेट खुपच वाढला आहे. एकंदरीत विचार करून सर्वानुमते पुण्यातील शाळा आणखी किमान 7 दिवस सुरू होणार नाहीत असं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं आहे. ते कोरोना आढवा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. त्यामुळे पुण्यातील शाळा आणखी किमान 7 दिवस तर सुरू होणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे. (Pune School Reopen)

 

 

मुंबईतील कोरोना रूग्णांची (Corona in Mumbai) संख्या कमी-कमी होत आहे. मात्र, पुण्यातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. आणखी काही दिवस पुण्यातील कोरोनाची संख्या वाढतच राहणार आहेत. किमान 8-10 दिवस रूग्णांची संख्या वाढत राहणार आहे असं तज्ञांनी सांगितलं आहे. पुणे शहर (Pune), पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) आणि पुणे जिल्हयातील (Pune Rural) कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट वाढत चालला आहे. (Pune School Reopen)

कोरोना विषयक आढावा बैठकीस शहरातील आमदार, दोन्ही महापालिकेचे महापौर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. शाळा आणखी 7 दिवस तरी सुरू होणार नाहीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. विनामास्क फिरणार्‍यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. लसीकरणावर देखील जास्तीत जास्त भर देण्यात येत आहे. त्याबाबत प्रशासनाला सुचना देण्यात आला आहे. कोविड मुक्त गाव अभियान सुरू केलं असून त्यामध्ये 1385 ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला आहे.

अजित पवार यांची पत्रकार परिषद सुरू…….

Web Title : Pune School Reopen | Schools in Pune will be closed for a few more days – Ajit Pawar (Video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rajesh Tope | राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

Pooja Hegde Instagram | कडाक्याच्या थंडीत पूजा हेगडेने चढवला इंटरनेटचा पारा, बिकिनी फोटोंमुळे चाहते झाले घायाळ

LIC Kanyadan Policy | LIC च्या कन्यादान पॉलिसीत दररोजच्या गुंतवणुकीवर मिळेल मोठी रक्कम, मिळू शकतात जवळपास 27 लाख

Eknath Khadse | जळगावच्या बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा; एकनाथ खडसेंना धक्का

12 BJP MLAs Suspension | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय
सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून, ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे