Pune School Reopen | पुण्यातील पहिली ते सातवीच्या शाळा 1 डिसेंबरला नाही तर ‘या’ तारखेला सुरु होतील, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्य सरकारने (Maharashtra Government) उद्या म्हणजेच 1 डिसेंबर पासून राज्यातील पहिलीपासूनचे वर्ग सुरु (Pune School Reopen) करण्याचा निर्णय घेतला. पण मुंबई महापालिकेने (BMC) 1 डिसेंबरऐवजी 15 डिसेंबरपासून शाळा सुरु (Pune School Reopen) करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता पुणे महापालिकेनं (Pune Corporation) देखील पुण्यातील शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी दिली.

 

शाळा सुरु (Pune School Reopen) करण्यासंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार
(Municipal Corporation Commissioner Vikram Kumar) यांच्या बैठक झाली. या बैठकीत पुण्यातील शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ओमिक्रॉन विषाणू (Omicron Variant) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तीन दिवसांसाठी निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत.
त्यामुळे पुण्यातील शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे.

 

राज्य सरकारने 1 डिसेंबरपासून पहिली ते चौथी शाळा सुरु करण्याची घोषणा केली आहे.
मात्र, पालक संघटना आणि शिक्षण संस्था यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेतला जाईल.
असे महापौरांनी सांगितले. त्यामुळे शाळा सुरु (Pune School Reopen) करण्याबाबत प्रशासनात संभ्रम असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
अखेर पुणे महापालिका आयुक्त आणि महापौर यांच्यात चर्चा झाल्यानंतर पहिली ते सातवीच्या शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्ग सुरु करण्यासाठीची तयारी पूर्ण झालेली आहे.
मात्र, ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या (Omicron variant) पार्श्वभूमीवर महापालिकेने सावध पवित्रा घेतला आहे.

 

Web Title : Pune School Repoen | pune schools will not open from 1st december due to omicron variant of coronavirus school reopen on 15 december mayor muralidhar mohol

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Parbhani Crime | झोपेतच मृत्यूने गाठलं ! घरावर उसाची ट्रॉली पडून महिलेचा मृत्यू, 8 वर्षाची नात गंभीर जखमी

Rekha Jare Murder Case | रेखा जरे हत्याकांडाला वर्ष झाले तरी न्यायालयात सुनावणी नाही

83 Trailer Out | स्वातंत्र्यानंतर परदेशाच्या भूमीवर ‘अशी’ कमवली ‘इज्जत’, रणवीर सिंगच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून चहाते म्हणाले – ‘सुपर हिट’ (व्हिडिओ)