Pune School Update | ‘पुण्यात पहिली ते आठवीचे वर्ग आता पूर्ण वेळ भरणार’ – अजित पवार (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune School Update | मागील काही दिवसांपासून पुण्यातील कोरोना बाधितांची (Coronavirus) वाढणारी संख्या आता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे लावलेले निर्बंध देखील शिथिल करण्यात आले आहे. त्याचबरोबर पुण्यातील शाळा, महाविद्यालये (Schools, Colleges) 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आल्या आहेत. तर, 1 ली ते 8 वीचे वर्ग (1st to 8th Class) चार तासच सुरू ठेवण्यात आले होते. आता पहिली ते आठवीचे वर्ग हे पूर्ण वेळ भरणार (Pune School Update) आहेत. याबाबत माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

पहिली ते आठवीचे वर्ग हे पूर्ण वेळ भरणार असल्याचा निर्णय पुण्यातील (Pune News) कोरोना स्थितीच्या आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ”1 फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा सुरू केल्या. पहिली ते आठवीचे वर्ग अर्ध वेळ भरवण्यात येत होत्या. पण आता पहिली ते आठवीचे वर्ग पण पूर्णवेळ भरवण्याचा निर्णय घेतला आहे.” (Pune School Update)

कोरोना परिस्थितीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, ”जागतिक परिस्थिती पाहता नव्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. पण दैनंदिन कोविड मृतकांच्या संख्येत वाढ झाली आहे. या मागचं नक्की कारण डॉक्टरांकडून शोधण्याचं काम सुरू आहे. फ्रान्स आणि अमेरिकेत नव्या रुग्णसंख्येत घट होतेय, जर्मनीत वाढ होतेय तर आपल्या देशात गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्येत 30 टक्क्यांनी घट झालीय. पुण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर, पुणे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्येत 50 टक्क्यांनी घट झाली असल्याचं ते म्हणाले.”

Web Title :- Pune School Update | pune school class 1 to 8 standard will start full day said ncp leader and dycm ajit pawar

 

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Anti Corruption Bureau (ACB) Aurangabad | 5 हजाराचा हप्ता घेणारा पोलीस निरीक्षक अँटी करप्शनच्या जाळयात

Pune Corporation Employees | पुणे महापालिकेतील 600 पेक्षा जास्त कर्मचारी केले जाणार कमी

SSC-HSC Board Exams | 10 वी, 12वीच्या विद्यांर्थ्यांसाठी खुशखबर ! आता परीक्षेसाठी उपलब्ध होणार Question Bank; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

Modi Government | केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! खाद्य तेलाच्या किंमती कमी होणार

Sangli Crime | सांगली जिल्ह्यात ‘सैराट’ ! प्रेमविवाह केला म्हणून तरुणावर प्राणघातक हल्ला; परिसरात खळबळ